Share

भाव गडगडल्याने शेतकऱ्याने तीन एकर उभ्या कोबीवर फिरवला रोटावेटर

कोबीला अवघा दोन रुपये किलो भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही. यामुळे येवल्यातील शेतकऱ्याने उभ्या पिकावर रोटावेटर फिरवला.

Published On: 

Shetkari Karjmafi details with NPA account and Haircut scheme info

लासलगाव, 5 ऑक्टोबर: बाजारभावातील घसरणीचा मोठा फटका बसल्याने येवला तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या तीन एकर क्षेत्रातील उभ्या कोबीच्या पिकावर रोटावेटर फिरवला आहे. गुलाबराव सोनवणे असे या शेतकऱ्याचे नाव असून, बाजारात अवघा दोन रुपये किलो इतका नीचांकी भाव मिळत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

दुष्काळी परिस्थिती असतानाही सोनवणे यांनी पाण्याचे नियोजन करून तीन एकर शेतात कोबीची लागवड केली होती. या पिकासाठी त्यांनी रोपे, मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशके, निंदणी आणि ट्रॅक्टरच्या मशागतीवर सुमारे तीन लाख रुपयांचा खर्च केला होता. पीक काढणीला आल्यानंतर सुरुवातीला कोबीला चांगला दर मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती.

सुरुवातीला कोबीला सुमारे साडेसहा रुपये प्रति किलोचा भाव मिळाला. त्यावेळी १२ टन कोबीची एक गाडी बाजारात पाठवून त्यांना ८० हजार रुपये मिळाले. मात्र, त्यानंतर बाजारात आवक अचानक वाढल्याने कोबीच्या दरात मोठी घसरण झाली. दर थेट दोन रुपये किलोपर्यंत खाली आल्याने उर्वरित पीक बाजारात पाठवणेही परवडेनासे झाले.

मजुरी, खते आणि मशागतीचा एकूण खर्च पाहता केवळ दोन रुपये किलोच्या दरातून उत्पादन खर्चही वसूल होणे अशक्य झाले. उभ्या पिकातून काहीच आर्थिक फायदा होणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर, सोनवणे यांनी आधी कोबीच्या शेतात जनावरांसाठी मेंढ्या सोडल्या आणि त्यानंतर रोटावेटरच्या साहाय्याने उर्वरित संपूर्ण पीक नष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

त्या शेतकऱ्याचे नाव गुलाबराव सोनवणे असे असून ते येवला तालुक्यातील आहेत.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही