Share

FDA मधून बदली नाही, भेसळविरोधी कारवाई सुरूच; तुकाराम मुंढेंचा सोशल मीडियावरून खुलासा

तुकाराम मुंढे यांची एफडीएमधून बदली झालेली नसून ते आयुक्तपदी कायम आहेत. त्यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

Published On: 

Tukaram Mundhe on Nana Patekar

मुंबई, 13 ऑक्टोबर: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासन (FDA Tukaram Mundhe) विभागातून बदली झालेली नाही. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात अन्नातील भेसळीविरोधातील त्यांची धडक कारवाई अशीच सुरू राहणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (MPSC) गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सचिवपदी प्रशासकीय अधिकारी म्हणून मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या नियुक्तीनंतर त्यांची एफडीएमधून बदली झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या बदलीनंतर राज्यातील भेसळविरोधी मोहिमेचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

या संभ्रमावर शासनाने स्पष्टीकरण देत, त्यांची केवळ एमपीएससीच्या चौकशी समितीवर नियुक्ती झाल्याचे सांगितले. त्यानंतर खुद्द मुंढे यांनीही याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझी FDA मधून बदली झालेली नाही. मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे.”

एमपीएससीमधील पेपरफुटी आणि अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे सलग ११ दिवस आंदोलन सुरू होते. सोमवारी (१२ ऑक्टोबर) मध्यरात्री मंत्री शिवेंद्रराजे यांच्या शिष्टाईनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर शासनाने ही ५ सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे.

या समितीत बीडी नाईक हे अध्यक्ष असून तुकाराम मुंढे सचिव आहेत. याशिवाय समितीत गणेश पाटील, पोलीस अधिकारी लखमी गौतम आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिलीप भोसले यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुंढेंच्या खुलाशामुळे आता राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले असून नागरिकांना सुरक्षित आणि शुद्ध अन्नाची शाश्वती मिळाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले की, त्यांची एफडीएमधून बदली झालेली नाही आणि ते अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तसेच भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची त्यांची लढाई सुरूच आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही