प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: राज्यातून मान्सूनने माघार घेतली असली तरी आता नागरिकांना उकाड्याचा तीव्र सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने (Weather Update) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या पाचही जिल्ह्यांमध्ये उद्यादेखील उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी सुट्टीच्या दिवशी बाहेर पडलेल्या नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागले. सांताक्रूझ हवामान केंद्रावर कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, तर कुलाब्यात ३६.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच, मुंबईत आज ३८.२ अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली असून ठाण्यात पारा ३७.२ अंशांवर पोहोचला आहे. शुक्रवारी आलेल्या उष्णतेच्या लाटेचीच पुनरावृत्ती रविवारीही पाहायला मिळाली.
वाढत्या तापमानासोबतच मुंबईतील हवेची गुणवत्ताही खालावत चालली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, मुंबई शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १०१ इतका नोंदवण्यात आला आहे. ही हवा ‘मध्यम’ श्रेणीत मोडत असून, यामुळे श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांना आणि आजारी व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
शहरातील विविध निरीक्षण केंद्रांवर हवेच्या गुणवत्तेची नोंद करण्यात आली असून, वांद्रे-कुर्ला संकुलात सर्वाधिक ४२४ इतक्या एक्यूआयची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ देवनारमध्ये १३७ आणि माझगावमध्ये ११५ एक्यूआय नोंदवला गेला. तसेच मालाड (९५), बोरिवली (७९), कुलाबा (७५), भायखळा (७३) आणि घाटकोपरमध्ये (६७) एक्यूआयची नोंद झाली. मुंबई महानगर क्षेत्राचा विचार केल्यास कल्याणमध्ये ८२, नवी मुंबईत ८० आणि ठाण्यात ७४ इतका हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात राहुल गांधींच्या कायदेशीर टीमकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
- “तुमच्या काकाने ऊसाला ५ हजारांचा दर ठेवलाय का?” शेतकरी संघटनेला दिलीप वळसे पाटलांनी सुनावले
- 8th Pay Commission: वाढत्या महागाईमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी; फिटमेंट फॅक्टर वाढीचा प्रस्ताव
Quick Answers
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देत 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, मुंबई शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १०१ इतका नोंदवण्यात आला असून ही हवा ‘मध्यम’ श्रेणीत मोडते.
शहरातील विविध निरीक्षण केंद्रांवर नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, वांद्रे-कुर्ला संकुलात सर्वाधिक ४२४ इतक्या एक्यूआयची नोंद झाली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
वाचकांचे महत्त्वाचे प्रश्न
हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट' दिला आहे?
महाराष्ट्र देशाच्या वृत्तानुसार, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट' दिला आहे.
ही उत्तरे AI च्या सहाय्याने तयार झाली असून संपादकीय मंजुरीनंतर प्रकाशित करण्यात आली आहेत.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








