दिल्ली, 12 ऑक्टोबर: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘व्होट चोरी’ झाल्याचा पुनरुच्चार करत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे. “मी निवडून आले असले तरी, या व्होट चोरीची चौकशी माझ्याच बारामती लोकसभा मतदारसंघापासून सुरू करा,” असे त्या म्हणाल्या. एकट्या खडकवासला विधानसभा क्षेत्रातून २ लाख ५० हजार मतदार कसे गायब झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
माध्यमांशी बोलताना सुळे यांनी मतदारांच्या आकडेवारीतील तफावत मांडली. त्यांच्या मते, बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण ७ लाख मतदार कमी झाले असून त्यातील अडीच लाख केवळ खडकवासल्यात घटले आहेत. राज्यात एका लोकसभेमागे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघात ५ लाख मतदार होते, त्यात विधानसभेवेळी ५० हजारांची वाढ झाली. मात्र विधानसभेनंतर हा मतदारसंघ अडीच लाखांनी कमी झाला. हे वाढलेले ५० हजार आणि कमी झालेले अडीच लाख मिळून ३ लाख मतदार कोण होते? ते दुबार होते की त्यांनी घर बदलले? याची माहिती देण्याची मागणी सुळे यांनी केली आहे. हवं तर जिथे मते प्लस आणि मायनस आहेत, ते दोन्ही मतदारसंघ चौकशीसाठी घ्यावेत, असेही त्या (Supriya Sule) म्हणाल्या.
केवळ राजीनामे देऊन प्रश्न सुटणार नाहीत, तर व्यवस्थेत बदल होणे गरजेचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली. सशक्त लोकशाहीत चर्चेने मार्ग निघतो, त्यामुळे आपण चर्चेला तयार आहोत, पण सत्ताधारी का तयार नाहीत? असा प्रश्न त्यांनी विचारला. देशातील बेरोजगारी, महागाई आणि व्होट चोरीचा डेटा समोर असतानाही सरकार काहीच करताना दिसत नाही. तसेच, राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. लोक महागाई आणि दुष्काळाचा सामना करत कसे जगणार, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, आज दिल्लीत संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चात आपले सर्व खासदार सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही खासदार दुष्काळात अडकल्याचेही त्यांनी सांगितले. काल दिल्लीत झालेल्या सीजेपीच्या आंदोलनावेळी पोलिसांमध्ये उडालेल्या गोंधळाची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. मीडिया ओळखपत्र दाखवूनही तीन पत्रकारांना अटक करण्यात आली आणि नंतर फोनाफोनी झाल्यावर त्यांना सोडण्यात आले.
जंतरमंतरवर एकट्या जाणाऱ्या एका १४ वर्षांच्या मुलाला पोलिसांनी अडवल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला. त्या मुलाने पोलिसांना १४४ कलमाचा अर्थ विचारत, आपण एकटे असल्याने कायद्यानुसार अटकाव होऊ शकत नसल्याचे ठणकावले. पण पोलिसांना त्या कलमाचा अर्थच माहीत नव्हता, यावरून दिल्ली पोलिसांच्या मनात काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोग स्वायत्त असूनही लोक त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत. देशाची वाटचाल आणीबाणीकडे सुरू असून सरकारची नैतिकता संपली आहे. लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रपतींकडे न्याय मागूनही तो मिळाला नसल्याची खंत सुळे यांनी व्यक्त केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- विरोधात बोलल्याने माझ्यावर हल्ला, जरांगे पाटलांनीच सुपारी दिली; अमोल खुणेंचा गंभीर आरोप
- आदित्य आणि अमित ठाकरेंच्या अडचणीत वाढ; शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा; काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे थेट जाहीर करणार
Quick Answers
सुप्रिया सुळे यांनी आपण निवडून आलो असलो तरी व्होट चोरीची चौकशी आपल्याच बारामती लोकसभा मतदारसंघापासून सुरू करण्याचे थेट आव्हान सत्ताधाऱ्यांना दिले आहे.
त्यांच्या मते, बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण ७ लाख मतदार कमी झाले असून, त्यातील एकट्या खडकवासला विधानसभा क्षेत्रातून अडीच लाख (२ लाख ५० हजार) मतदार कमी झाले आहेत.
विधानसभेवेळी वाढलेले ५० हजार आणि नंतर कमी झालेले अडीच लाख मिळून ३ लाख मतदार कोण होते, ते दुबार होते की त्यांनी घर बदलले, याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आंदोलनावेळी मीडिया ओळखपत्र दाखवूनही तीन पत्रकारांना अटक करण्यात आली होती आणि नंतर फोनाफोनी झाल्यावर त्यांना सोडण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









