Share

आदित्य आणि अमित ठाकरेंच्या अडचणीत वाढ; शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा आणि विनापरवानगी आंदोलनाप्रकरणी आदित्य व अमित ठाकरे यांच्यासह ३०० हून अधिक जणांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Published On: 

Mumbai Protest against CEC Gyanesh Kumar at Shivaji Park

मुंबई, 12 ऑक्टोबर: परवानगीविना आंदोलन करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि अमित ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंदोलकांनी भरलेली पोलिसांची गाडी अडवून शासकीय कामकाजात व्यत्यय आणल्याचा मुख्य ठपका ठाकरे बंधूंवर ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर बेकायदेशीररित्या जमाव जमवल्याचा आरोपही पोलिसांनी लावला आहे.

या कारवाईत आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यासोबतच ठाकरे आणि मनसेच्या अनेक प्रमुख नेते तसेच पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये अनिल परब, सुनील प्रभू, महेश सावंत, वरुण सरदेसाई, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार या नेत्यांचा समावेश आहे.

या राजकीय नेत्यांच्या जोडीलाच आंदोलनात सहभागी असलेल्या ३०० हून अधिक कार्यकर्त्यांवरही मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही