प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेतली. या बैठकीत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
एरवी नोव्हेंबर अखेरीस दुष्काळ जाहीर केला जातो. मात्र, यंदा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ऑक्टोबर महिन्यातच याबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला. दुष्काळ निवारणाची प्रशासकीय प्रक्रिया दिवाळीआधी पूर्ण करणे कठीण असल्याने, सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मदत म्हणून हा ५ हजार रुपयांचा अग्रीम देण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
राज्यात नव्याने ४० तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला असून, एकूण दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या आता ३०५ झाली आहे. या सर्व तालुक्यांमध्ये १२ प्रकारच्या सवलती लागू राहतील. तसेच कर्जमाफीचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. मराठवाड्यात भूजल पातळी ३ मीटरपेक्षा खाली गेल्याने तिथे मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे. या सर्व टँकरचे जीपीएस प्रणालीद्वारे ट्रॅकिंग केले जाणार आहे.
पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याला सरकारचे प्राधान्य असून, आतापर्यंत तब्बल १६ हजार बेकायदा पाणी कनेक्शन तोडण्यात आले आहेत. तसेच, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीच्या जीआरमधील अटी-शर्ती सरकारने हटवल्या आहेत. वीज बिल किंवा कर्ज वसुलीसाठी बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी तगादा लावू नये, याबाबत अतिउत्साह दाखवल्यास कारवाई केली जाईल. तसेच, शेतकऱ्यांनी चारा किंवा चारा पिकांची लागवड केल्यास राज्य सरकार तो विकत घेईल, अशी महत्त्वपूर्ण माहितीही त्यांनी दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सचिन सानपांच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी
- ५ महिन्यात ३ मंत्र्यांचे राजीनामे… दोघांचं तिकीट कापलं; मोदी सरकारचा नवा डाव काय?
- “पीएम मोदींचे सलग १० कॉल, पण मी उचललेच नाही”; ओडिशाच्या नवनिर्वाचित राज्यपालांनी सांगितला तो रंजक किस्सा
Quick Answers
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात नव्याने ४० तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला असून, यामुळे एकूण दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३०५ झाली आहे.
मराठवाड्यात भूजल पातळी ३ मीटरपेक्षा खाली गेल्याने तिथे मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध केले जातील आणि या टँकरचे जीपीएस प्रणालीद्वारे ट्रॅकिंग केले जाईल.
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीच्या जीआरमधील अटी-शर्ती सरकारने हटवल्या आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








