पुणे, 14 ऑक्टोबर: पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपला सोडल्यामुळे शिवसेनेत सध्या नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदेंकडून पदाधिकाऱ्यांना युतीधर्म पाळण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या बैठकीला उदय सामंत, रवींद्र धंगेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघातून उदय सामंत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन सानप हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असावा आणि त्याला प्रश्नांची जाण असावी, ही भूमिका घेऊन आपण रिंगणात उतरल्याचे त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.
सानप यांनी सर्व राजकीय पक्षांना आणि विशेषतः एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. शिंदे साहेब यावर सकारात्मक विचार करतील, असे जाणवल्याने आपण त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचे सानप म्हणाले. तसेच, सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि प्राध्यापक संघटना या निवडणुकीची जोरदार तयारी करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पाठिंब्यासाठी गेल्या आठवड्यात आपण उदय सामंत यांचीही भेट घेतल्याचे सानप यांनी सांगितले. मात्र, पक्षाच्या निर्णयानुसारच पुढील गोष्टी ठरतील, असे सामंत यांनी तेव्हा स्पष्ट केले होते. मुंबईत बैठकीसाठी गेलो असताना, तिथे दुसरी बैठक सुरू असल्याने 'तुला लवकरच काय ते कळवण्यात येईल,' असा निरोप मिळाल्याचे सानप म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना आणि शिक्षकांच्या इतर प्रश्नांवर यापूर्वी घेतलेली सकारात्मक भूमिका पाहता, आपल्याला त्यांच्याकडून पाठिंब्याची मोठी अपेक्षा आहे. आपण आपल्या कामाचे सादरीकरण त्यांच्यासमोर केले आहे. पाठिंब्यासाठी आपण शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या असून, पक्षश्रेष्ठी यावर नक्कीच सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास सानप यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ५ महिन्यात ३ मंत्र्यांचे राजीनामे… दोघांचं तिकीट कापलं; मोदी सरकारचा नवा डाव काय?
- “पीएम मोदींचे सलग १० कॉल, पण मी उचललेच नाही”; ओडिशाच्या नवनिर्वाचित राज्यपालांनी सांगितला तो रंजक किस्सा
- अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची खोचक टीका
Quick Answers
पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपला सोडल्यामुळे शिवसेनेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना युतीधर्म पाळण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असावा आणि त्याला प्रश्नांची जाण असावी, ही भूमिका घेऊन सचिन सानप यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्याचे सांगितले आहे.
पक्षाच्या निर्णयानुसारच पुढील गोष्टी ठरतील, असे उदय सामंत यांनी सचिन सानप यांना स्पष्ट केले होते.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







