आमचा विजय निश्चित! एकनाथ शिंदेंनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा : मंत्री चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा दावा करत, एकनाथ शिंदे यांनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: महायुतीचे उमेदवार असलेल्या स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

या दोन्ही उमेदवारांचा प्रचार अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच, आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची एकत्रित बैठक पार पडणार आहे. आपला विजय निश्चित असला तरी, विजयाचे मताधिक्य आणखी वाढवण्याच्या दृष्टीने या बैठकीत रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

याच धर्तीवर शिवसेनेच्या कार्यालयातही बैठकीचे नियोजन आज संध्याकाळी किंवा उद्या केले जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळेस त्यांनी, "राजकारणात काहीही होऊ शकते, अर्ध्या मिनिटात निर्णय बदलतात," असे सूचक विधानही केले.

सचिन सानप यांच्याबाबत विचारले असता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांच्याबद्दलचा एकत्रित निर्णय घेतला जाईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

महायुतीचे उमेदवार स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित असल्याने एकनाथ शिंदे यांनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही