‘तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?’; मटका माफियाच्या दर्शनावरून दानवेंना राणाजगजितसिंहांचे प्रत्युत्तर

सोलापूरच्या कथित मटका माफियाच्या तुळजाभवानी मंदिर प्रवेशावरून अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेला भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: सोलापूरच्या एका कथित मटका माफियाला तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात नेऊन दर्शन घडवल्याच्या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे. 'तुळजाभवानी मंदिर संस्थान ही राणा पाटलांची जहागिरी आहे का?' असा खोचक सवाल दानवे यांनी केल्यानंतर, पाटील यांनीही त्यांच्यावर पलटवार केला आहे.

तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवादरम्यान सामान्य भाविकांना गाभाऱ्यात जाण्यास बंदी असताना, सोलापूरच्या एका मटका व्यावसायिकाने आत जाऊन दर्शन घेत फोटोसेशन केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्वीय सहायकानेच (पीए) या व्यक्तीला गाभाऱ्यापर्यंत नेल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला. यावरूनच त्यांनी मंदिर संस्थानावरील पाटलांच्या वर्चस्वावर बोट ठेवत सडकून टीका केली.

दानवे यांच्या या आरोपांना उत्तर देताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. 'अंबादास दानवे हे सुसंस्कृत नेते आहेत का, यावरच मुळात प्रश्नचिन्ह आहे,' असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, गाभाऱ्यात घडलेला दर्शनाचा प्रकार अतिशय गंभीर असून याप्रकरणी दोषींना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. आपल्या पीएबाबत सुरू असलेल्या चर्चेतील सत्य लवकरच समोर येईल, असे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे स्पष्ट केले. याआधीही उजनी धरणाच्या पाण्याच्या प्रश्नावरून या दोन्ही नेत्यांमध्ये असाच वाद रंगला होता.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही