Chandrashekhar Bawankule | “काँग्रेसला स्वत:ची माणसे सांभाळता येत नाहीत म्हणून ते…”; चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका

Chandrashekhar Bawankule | नागपूर : नाशिक पदवीधर मतदार संघातून सत्यजित तांबे यांनी अर्ज भरल्यामुळं काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं चित्र दिसत आहे. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नागपुरात आज दिली. यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“काँग्रेसला स्वत:चीच माणसे सांभाळता येत नाहीत. त्यामुळे ते दुसऱ्यावर टीका करतात. त्यांनी प्रथम आपले घर वाचवावे. त्यांचे घर कच्चे झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वावर आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे”, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला.

पुढे ते म्हणाले, “सत्यजीत तांबे यांनी अजूनही आम्हाला पाठिंबा मागितला नाही. आमच्याकडे आले तर आमच्या राज्य आणि केंद्रीय संसदीय मंडळाकडे हा विषय जाईल आणि ते निर्णय घेतील. आमच्या तीन उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र त्यांना एबी फॉर्म दिले नाही.”

नाना पटोलेंच वक्तव्य काय?

आम्ही काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबे यांनी तिकीट दिलं होतं. त्यांनी उमेदवारी अर्ज न भरात पक्षाबरोबर फसवेगिरी केली आहे. आपल्या मुलाचा अपक्ष अर्ज भरून त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपाचा पाठिंबा घेणार आहे. ही एकप्रकारे काँग्रेसशी गद्दारी आहे, असेही ते म्हणाले. भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याच दुःख कळेल, असंही पटोले म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button