Share

मनोज जरांगे पाटलांची ‘ती’ सर्वात मोठी मागणी अखेर मान्य, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनातील उर्वरित ३४ मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Published On: 

Maratha Reservation protest updates and Maharashtra government aid announcement

मुंबई – मराठा आरक्षणाच्या आंदोलनात (Maratha Reservation) ज्या कुटुंबांनी आपले हक्काचे माणूस गमावले, त्यांच्या अश्रूंची किंमत कधीतरी होणार का? अंतरवाली सराटीच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरलेला हाच अत्यंत संवेदनशील प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

आंदोलनात जीव गमावलेल्या उर्वरित ३४ कार्यकर्त्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यास राज्य सरकारने तातडीने मंजुरी दिली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली.

मनोज जरांगे यांच्या मागणीला यश

या निर्णयामुळे आठ जिल्ह्यांतील पीडित कुटुंबांना एकूण ३ कोटी ४० लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. आधीच्या निर्णयांतून सुटलेल्या या ३४ कुटुंबांचा प्रश्न जरांगे यांनी उपोषणादरम्यान आक्रमकपणे मांडला होता.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ही मदत मंजूर करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक १५ कुटुंबे बीड जिल्ह्यातील आहेत.

त्याशिवाय धाराशिवमधील ५, परभणी आणि हिंगोलीतील प्रत्येकी ४, नांदेडमधील ३ तर जालना, लातूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येकी एका कुटुंबाचा यामध्ये समावेश आहे. आंदोलनातील मृतांचा एकूण आकडा ३०९ असून, त्यांच्यासाठी सरकारने आतापर्यंत साडेसत्तावीस कोटी रुपये मंजूर केले आहेत.

उपोषण सुटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना आपली पहिली प्रतिक्रिया दिली. आम्ही जरांगे यांना जी आश्वासने दिली ती सर्वांसमोर उघडपणे दिली आहेत, कोणतेही आश्वासन मागे दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेवर ठाम असून दिलेला शब्द पाळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच जरांगे यांच्या आंदोलनानंतर आता उपसमितीच्या बैठकीत मागण्यांवर वेगाने हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही