Share

जेवणात भेसळ किंवा गुटखा विक्री दिसल्यास थेट तुकाराम मुंढेंना करा कॉल, कारवाईचा धडाका सुरू

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ आणि गुटखा विक्रीविरोधात थेट तक्रार करण्यासाठी नागरिकांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

Published On: 

Tukaram Mundhe FDA Action against food adulteration in Maharashtra

मुंबई – तुम्ही हॉटेलमध्ये जेवताय किंवा दुकानातून मिठाई आणताय, पण त्यात काही भेसळ तर नाही ना? राज्यात कुठेही उघडपणे गुटखा विकला जातोय का? अशा प्रश्नांनी तुम्हालाही कधी ना कधी सतावलं असेलच. पण आता यावर थेट राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांकडे (Tukaram Mundhe) दाद मागता येणार आहे.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नुकतीच एफडीएच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. जबाबदारी स्वीकारताच त्यांनी धडक कारवाई सुरू करत नागरिकांसाठी थेट तक्रार करण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक आणि ई-मेल आयडी जाहीर केला आहे. त्यामुळे आरोग्याशी खेळणाऱ्यांची आता खैर नाही, हे कृतीतून स्पष्ट झाले आहे.

तुकाराम मुंढेंचा थेट इशारा

गेल्या सहा दिवसांत राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेअंतर्गत २०३ ठिकाणी छापे टाकून १०२ जणांना अटक करण्यात आली. तर तब्बल ६८ दुकाने आणि हॉटेल्सवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. अन्न किंवा औषधांमध्ये होणाऱ्या भेसळीची तक्रार नेमकी कुठे करावी, याबाबत नागरिकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. त्यामुळेच मुंढे यांनी १८००२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक आणि [email protected] हा ईमेल थेट नागरिकांसाठी खुला केला आहे.

धुळे जिल्ह्यात अशीच एक मोठी कारवाई पार पडली. मुंबई आग्रा महामार्गावरून राजस्थानातून येणारा तब्बल साडेअठरा लाख रुपयांचा गुटखा प्रशासनाने जप्त केला असून संबंधित चालकावर गुन्हा दाखल केला आहे. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एफडीए विभाग अलीकडे चर्चेत होता. मात्र, २५ मे रोजी मुंढेंनी पदभार स्वीकारल्यापासून विभागाच्या कामात मोठी गती आल्याचे पाहायला मिळत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही