Share

‘माझी २० वर्षे महाराष्ट्रात गेली पण…’, भर कार्यक्रमात कंगना रनौत मराठी अभिनेत्रींबाबत नेमकं काय म्हणाली?

‘भारत भाग्य विधाता’च्या ट्रेलर लाँच सोहळ्यात कंगना रनौतने गिरीजा ओक आणि स्मिता तांबे या मराठी अभिनेत्रींसह मराठी रंगभूमीचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

Published On: 

Kangana Ranaut - Kangana praises Marathi actresses at Bharat Bhagya Vidhata trailer launch

बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी आणि नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी चर्चेत असणारी कंगना रनौत (Kangana Ranaut) चक्क मराठी अभिनेत्रींच्या प्रेमात पडली आहे, यावर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरंय.

निमित्त होतं कंगनाच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ या बहुचर्चित सिनेमाच्या ट्रेलर लाँचचं. १२ जून रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये धडकणार असून, मंगळवारी त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Kangana Ranaut Praises Marathi Actresses

विशेष म्हणजे या सिनेमात कंगनासोबत गिरीजा ओक, स्मिता तांबे, सुहिता थत्ते आणि ईशा डे या मराठमोळ्या अभिनेत्रींची तगडी फौज मैदानात उतरली आहे. याच भव्य सोहळ्यात बोलताना कंगनाने मराठी रंगभूमी आणि कलाकारांचं तोंडभरून कौतुक करत उपस्थितांची मनं जिंकली.

ट्रेलर लाँचच्या मंचावरून बोलताना कंगनाने आपला अनुभव अगदी मनमोकळेपणाने मांडला. ती म्हणाली, “मी गेली २० वर्षे महाराष्ट्रात राहतेय, पण मराठी कलाकारांसोबत इतक्या जवळून काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. मराठी रंगभूमी आणि इथली चित्रपटसृष्टी किती समृद्ध आहे, हे सर्वांनाच माहीत आहे.”

सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल सांगताना तिने गिरीजा ओक आणि स्मिता तांबे यांचे आवर्जून आभार मानले. “सेटवर या दोघींनी मला खूप मदत केली. माझ्या पात्राचे अचूक उच्चार आणि इथली जीवनशैली नेमकी कशी असते, हे समजून घेण्यासाठी त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. सिनेमात आमची हीच भन्नाट आणि नैसर्गिक केमिस्ट्री तुम्हाला पाहायला मिळेल,” असा विश्वासही तिने व्यक्त केला. कुटुंबासाठी आणि देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या महिलांची ताकद या सिनेमात दिसणार असल्याचं तिने स्पष्ट केलं.

‘भारत भाग्य विधाता’ सिनेमात कंगना एका सामान्य नर्सच्या भूमिकेत आहे. जिच्या कामाकडे सुरुवातीला सर्वांकडूनच दुर्लक्ष केलं जातं, पण एका दहशतवादी हल्ल्याच्या वेळी तीच नर्स स्वतःचा जीव धोक्यात घालून शेकडो लोकांचे प्राण वाचवते. सामान्य परिचारिकेपासून ते खऱ्या धाडसी ‘हिरो’पर्यंतचा हा थरारक प्रवास १२ जूनला पडद्यावर उलगडणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही