Share

दिलीप वळसे पाटील अचानक सिल्व्हर ओकवर; शरद पवारांसोबतची भेट राजकीय भूकंपाची नांदी?

दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओकवर अचानक भेट झाली. कार्यालयाकडून सहकार क्षेत्रावरील चर्चेचा दावा असला तरी राजकीय चर्चांना उधाण आलंय.

Published On: 

Sharad Pawar and Dilip Walse Patil meeting - शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची सिल्व्हर ओकवरील भेट

🕒 1 min read

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आता मिटणार की आणखी काही मोठा राजकीय स्फोट होणार? अजित पवार गटाचे बडे नेते दिलीप वळसे पाटील यांनी थेट ‘सिल्व्हर ओक’ गाठून शरद पवारांची भेट घेतल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओकवर झालेल्या या अनपेक्षित बैठकीचे फोटोही आता समोर आले आहेत. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये बरीच काळ चर्चा चालली. त्यामुळेच राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.

दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार भेटीमागचं खरं कारण काय?

दुसरीकडे, या भेटीला कोणताही राजकीय रंग नसल्याचा दावा वळसे पाटील यांच्या कार्यालयाने केलाय. कांद्याचे गडगडलेले भाव आणि राज्यातील सहकार क्षेत्रातील प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि यशवंतराव चव्हाण सेंटरसारख्या संस्थांमध्ये वळसे पाटील आजही सक्रिय आहेत. शरद पवार (Sharad Pawar) या संस्थांचे अध्यक्ष असल्याने त्यांच्यात कामाच्या निमित्ताने बैठका होतच असतात, असंही स्पष्टीकरण आता दिलं जातंय.

अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीही यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. “आमच्या नेत्यांचे पवार साहेबांसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ही भेट पहिल्यांदा झालेली नाही, त्यामुळे यात गैर समजण्याचं काहीच कारण नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

पण राजकारणात जे दिसतं, तसं कधीच नसतं. याआधीही अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी पवारांची भेट घेतली होती. त्यामुळेच या भेटीमागे नक्की काय शिजतंय, हे येत्या काळातच समोर येईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही