सरकारचे दोन GR धडकले, पण कांदा उत्पादकांचा संताप कायम! २५ रुपये भाव मिळणार की पुन्हा आंदोलन पेटणार?

कांद्याला १५.८० रुपये दर आणि अटी शिथिल करूनही शेतकरी समाधानी नाहीत. २५ रुपयांच्या मागणीसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे.

Published On: 

Onion Price Agitation - Angry Maharashtra farmers protesting for higher onion prices.

गेल्या १५ दिवसांपासून रस्त्यावर उतरलेल्या कांदा उत्पादक (Onion Price Agitation) शेतकऱ्यांच्या पदरात सरकारने नक्की काय टाकलंय? सलग दोन जीआर काढूनही बळीराजाचा संताप का थांबत नाहीये? हा प्रश्न आता सर्वांनाच सतावू लागला आहे.

उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाचा मोठा भडका उडाल्यानंतर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी थेट दिल्ली गाठून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. त्यानंतर केंद्र सरकारच्या अनुकूल भूमिकेमुळे राज्याने तातडीने दोन शासन निर्णय काढले. कांदा खरेदीत ३ रुपये ४५ पैशांची वाढ करून दर १५.८० रुपये केला, पण तरीही खळबळ काही थांबलेली नाही.

Onion Price Agitation

शासकीय खरेदीतील जाचक अटी शिथिल करून सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला खरा. पण, शेतकऱ्यांची थेट आणि स्पष्ट मागणी आहे ती २५ रुपये प्रति किलोची. जोपर्यंत बाजार समित्यांमधून थेट २५ रुपये दराने कांदा उचलला जात नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे वाढीव दर मिळूनही नाराजीचा सूर कायम आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने या वाढीव हमीभावाच्या मागणीवर तातडीने तोडगा काढला नाही, तर पुन्हा एकदा उग्र आंदोलन होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, विरोधकांनीही याच मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला असून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा कांद्यावरून तापलंय.

दरम्यान, सरकारने नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) कांदा खरेदीवर बाजार समिती शुल्क माफ करण्याचे आदेश दिले आहेत. पणन संचालनालयाने तसे परिपत्रक काढले असून शासनाचे २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे मोठे उद्दिष्ट आहे. यात सुमारे ३१६ कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.

मात्र, या शुल्क माफीमुळे बाजार समित्यांचे तब्बल ३ कोटी १६ लाखांचे संभाव्य नुकसान होणार आहे. आता याच निर्णयाचा आधार घेत व्यापाऱ्यांनीही शुल्क माफीची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे एकीकडे शेतकरी नाराज, तर दुसरीकडे बाजार समित्या आणि व्यापारीही संभ्रमात अशी विचित्र अवस्था सध्या निर्माण झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही