Devendra Fadnavis on Farmers : शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आहे. राज्य सरकारने अखेर कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित केला आहे. एकूण ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ५,०२९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये हस्तांतरित केली. ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (authentication) पूर्ण केले आहे, त्यांच्या कर्जखात्यांमध्ये ही रक्कम थेट जमा करण्यात आली असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व बँकांना दिले आहेत, जेणेकरून त्यांना नवीन शेती हंगामासाठी आर्थिक बळ मिळेल.
Devendra Fadnavis Farmer loan waiver first installment
तसेच, पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही, त्यांच्यासाठी प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभाची रक्कम कर्जखात्यात जमा केली जाईल, अशी घोषणाही फडणवीसांकडून करण्यात आली.
फडणवीस यांची प्रतिक्रिया
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’बद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी नमूद केले की, मला अतिशय आनंद आहे की आपण ‘अहिल्या देवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जी घोषित केली होती. त्या अंतर्गत पहिली यादी घोषित केली. घोषित केलेली यादी सर्व ग्रामपंचायतींना पाठवली.”
“साध्या पद्धतीने शेतकऱ्यांनी आधार ऑथेंटिकेशन करायचे. अर्ज नाही. बाकी काही नाही. त्यांची खाती निल करायची अशा प्रकारचे काम हाती घेतले होते. आज जवळपास ५ हजार २९ कोटी रुपये ६ लाख २०२२ शेतकऱ्यांच्या खात्यात लाभ गेला आहे. ही खाती निल झाली आहेत.” असे फडणवीस यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “एमपीएवर लावलेले व्याज होते. त्यामुळे कर्ज अधिक दिसत होते. बँकांनी ते व्याज रद्द केल्याने अकाऊंटमधील पैसे आणि शासनाने भरलेले पैसे सारखे असल्याने ही अकाऊंट निल झाली आहे.”
“आता रोज मोठ्या प्रमाणात अकाऊंट येतील. जसे जसे अकाऊंट येतील त्या खात्यात पैसे जातील. १२ लाख अकाऊंट बँकांना परत पाठवले. बँकांनी चुका केल्या. आठवड्या भरात तेही सुधारून परत करणार आहे. हे अकाऊंट क्लिअर होऊन त्यात पैसे टाकले जाणार आहे.” असा विश्वास फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करायला हवा होता’; संजय राऊतांचा घणाघात
- खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ पाटी लावणं पडणार महागात, राज्यभर धडक कारवाईचे आदेश
- ‘संसदेत येऊन उत्तर द्या’; अमित शहा यांच्या अनुपस्थितीवर काँग्रेसचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












