मुंबई– गाडीवर ‘पोलीस’ अशी लाल पाटी आहे का? असेल तर सावधान. कारण आता हीच पाटी तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते. राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दणका बसला आहे. स्वतःच्या खाजगी दुचाकी किंवा चारचाकीवर ‘पोलीस’ लिहून रुबाब झाडणाऱ्यांवर आता थेट कारवाई होणार आहे. अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने तसे स्पष्ट आदेश राज्यभर दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकारावर आधीच तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता संपूर्ण पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, महामार्ग पोलीस अधीक्षक आणि जिल्हा अधीक्षकांना कारवाईच्या स्पष्ट सूचना मिळाल्या आहेत.
हा सगळा प्रकार सखाराम कुलकर्णी यांच्या तक्रारीनंतर समोर आला. कुलकर्णी यांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना २७ जून २०२६ रोजी एक ई-मेल पाठवला होता. त्यात त्यांनी या गंभीर बाबीकडे शासनाचे लक्ष वेधले होते.
अनेकदा ‘पोलीस’ पाटी (Police Board) लावलेली गाडी बघून पोलीस नाक्यावर तपासणी होत नाही. अशा गाड्या विनाचौकशी सोडल्या जातात. त्यामुळेच या गाड्यांमधून अवैध वस्तूंची वाहतूक होण्याची मोठी शक्यता असते.
काही जण तर भाडेतत्त्वावर या गाड्या चालवतात. समाजात दहशत निर्माण करणे किंवा बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी या पाट्यांचा गैरवापर होतो. तक्रारीतील याच अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांची शासनाने अतिशय गंभीर दखल घेतली आहे.
त्यामुळे आता मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम १३३(६) आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १७७ नुसार आता थेट दंड आकारला जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘संसदेत येऊन उत्तर द्या’; अमित शहा यांच्या अनुपस्थितीवर काँग्रेसचा हल्लाबोल
- ‘लोक भाजपलाच मत देणार असतील तर आता भोगा’; राज ठाकरे यांनी नाशिककरांना सुनावणे
- ‘डिग्री चुलीत घालायच्या का?’ उद्योगासाठी तारण मागणाऱ्या बँकांवर सदाभाऊ खोतांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












