Share

बिडकीनमध्ये खाकी झाली लाचार; गुन्हेगारांचे सोशलाईझिंग आणि वाळू तस्करांचे साम्राज्य, स्थानिक नेत्याच्या वरदहस्ताची इनसाईड स्टोरी!

बिडकीन पोलीस ठाण्याचे API निलेश शेळके पुन्हा वादात. हत्येच्या आरोपीला व्हीआयपी ट्रिटमेंट, वाळू-गुटखा माफियांना अभय आणि बोगस ई-चलन प्रकरणी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप.

Published On: 

API Nilesh Shelke controversies related to Bidkin Police Station in Chhatrapati Sambhajinagar

बिडकीन– गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायच्या सोडून पोलीसच जर नियम धाब्यावर बसवू लागले, तर सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा? सध्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील बिडकीन पोलीस ठाण्याचा कारभार पाहिला की हाच संतप्त सवाल उपस्थित होतो.

बिडकीनचे प्रभारी अधिकारी (API Nilesh Shelke) निलेश शेळके सध्या एकामागून एक गंभीर आरोपांमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. हत्येचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीच्या मुलाला स्वतःच्या केबिनमध्ये बसवून ‘व्हीआयपी’ ट्रिटमेंट देण्यापासून ते थेट वरिष्ठांचे आदेश धुडकावून बोगस ई-चलन फाडण्यापर्यंतचे धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आले आहेत.

बिडकीनमध्ये नियमांची पायमल्ली; अवैध धंदे ते बोगस ई-चलनाची मालिका

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही दिवसांपूर्वीच शेळके यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करत मोठा गौप्यस्फोट केला होता. लाखेगाव येथे एका शेतकरी महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिनाभर उलटूनही पोलिसांना सापडलेला नाही. पण त्याच आरोपीचा मुलगा बिडकीन पोलीस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसोबत (API Nilesh Shelke) बसून इन्स्टाग्रामवर स्टोऱ्या टाकतोय.

मा. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पोस्ट 

गुन्हेगारांना केबिनमध्ये ‘व्हीआयपी’ वागणूक!

२२ मे रोजी लाखेगाव, पैठण येथे एका शेतकरी महिलेवर झालेल्या अमानुष हल्ला होऊन तिला शेतातील कापसाच्या फासावर जाळणाचा प्रयत्न होतो या प्रकरणी अनेक गंभीर प्रश्न अनुत्तरित आहेत. कलम ३०७ IPC अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचा आरोप होत आहे. गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना असून तपासाच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आरोपींचा शोध घेण्यात नेमका विलंब का होत आहे? पीडितेला न्याय कधी मिळणार? पोलिसानी आरोपी कडून प्रचंड पैसा घेऊन आरोपिंना संरक्षण देताय. तब्बल १ महिनेनंतर ही मुख्य आरोपी पकडले जात नाही? आणि त्यातील मुख्य आरोपीचा मुलगा बिडकीन पोलिस स्टेशन मध्ये तपास अधिकारी निलेश शेळके सोबत इन्स्टग्राम स्टोरी टाकतोय. पोलिसांवरील विश्वास टिकवायचा असेल तर या प्रकरणाचा पारदर्शक, निष्पक्ष आणि जलद तपास होणे आवश्यक आहे. अन्यथा जनतेच्या मनातील संशय आणखी गडद होत जाईल.

पोलिसांनीच आरोपीला संरक्षण दिले आहे का, असा थेट सवाल दानवे यांनी उपस्थित केला होता. यातच दिवाळीत पोलीस कर्मचाऱ्यांना वाटलेली चांदीची नाणी कुठून आली, यासाठी नेमका कुणाचा पैसा वापरला गेला, हे गूढ अद्याप उकललेले नाही. या जुन्या वादाची शाई वाळत नाही तोच, आता आणखी एका नव्या प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या वाळू तस्करी, बेकायदेशीर भू-खनन आणि मुरूम चोरी राजरोसपणे सुरू आहे. यासोबतच संपूर्ण पैठण तालुका गुटखा माफियांच्या विळख्यात सापडला असून, बिडकीन आणि पाचोड परिसरात छुप्या मार्गाने गुटख्याची मोठी उलाढाल सुरू आहे. या अवैध धंद्यांना आणि माफियांना निलेश शेळके उघडपणे पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

या संपूर्ण प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर येत आहे. बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत इतके गंभीर प्रकार घडूनही आणि खुद्द विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी थेट आरोप करूनही, API शेळके यांच्यावर अद्याप ठोस कारवाई का झाली नाही? सूत्रांच्या माहितीनुसार, यामागे स्थानिक पातळीवरील एका मोठ्या राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे. याच राजकीय आश्रयामुळे वाळू, गुटखा माफियांचे जाळे आणि पोलिसांची मनमानी सुरू असून, वरिष्ठांकडूनही केवळ चौकशीचे सोपस्कार पार पाडले जात असल्याचे बोलले जात आहे.

अवैध व्यापाऱ्यांकडून स्थानिक यंत्रणेला मॅनेज केले जात असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. लहान मुलांपर्यंत हा घातक पदार्थ सहज पोहोचत असून, पोलीस याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे बोलले जाते.

दुसरीकडे, वाहतूक कारवाईच्या नावाखाली पोलिसांनी थेट वरिष्ठांचेच कडक आदेश धाब्यावर बसवल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी रस्ते अपघात रोखण्यासाठी ८ जूनला जिल्ह्यात मोठी धडक मोहीम राबवत ११४९ वाहनचालकांवर कारवाई केली होती. मात्र, टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात बिडकीन पोलिसांनी भलतेच उद्योग केले.

गाडी चक्क पोलीस स्टेशनच्या आवारात उभी असताना, त्यांना ‘चित्तेगाव’ लोकेशन दाखवून ई-चलन पाठवण्यात आले. विशेष म्हणजे, पोलिसांनीच पुराव्यासाठी दिलेल्या फोटोत गाडीच्या शेजारून एक मोठा ट्रक आरामात जाताना दिसत आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडीचा मुद्दाच ही फोल ठरतो.

महाराष्ट्र राज्याच्या अपर पोलीस महासंचालकांनी (वाहतूक) अशा कारवाईसाठी केवळ अधिकृत ‘ई-चलन डिव्हाईस’ वापरणे सक्तीचे केले आहे. स्वतःच्या खासगी मोबाईलवरून फोटो काढून चलन जनरेट केल्यास थेट निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट निर्देश आहेत. असे असूनही, मोबाईलवरून फोटो काढून कारवाई केल्याची कबुली खुद्द API शेळके यांनी दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता उघडपणे नियम मोडणाऱ्या या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरून नेमकी काय आणि कधी कारवाई होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पातळीवर या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. बिडकीन पोलीस ठाण्यातील या सर्व प्रकारांमुळे ग्रामीण पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असून, चौकशी अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही