Share

ना अजित दादा, ना शिंदे गट! शरद पवारांच्या खासदारांच्या फुटीचा सस्पेन्स अखेर संपला

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील खासदार फुटीच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला असून, पक्षातील अंतर्गत मतभेद मात्र कायम असल्याची माहिती समोर आली आहे.

Published On: 

Sharad Pawar

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) बाबत नवी माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटातील (Shivsena Thackeray Gat) खासदारांच्या फुटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील (Sharad Pawar Gat) खासदारही अजित पवार गटात (Ajit Pawar Gat) किंवा शिंदे गटात (Shinde Gat) जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र, सध्या तरी राष्ट्रवादी (NCP) शरद पवार गटातील खासदार फुटीचा धोका टळल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील खासदार किंवा प्रमुख नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता सध्या दिसत नाही. त्यामुळे शरद पवार गटावर आलेले फुटीचे संकट काही काळासाठी दूर झाल्याचे चित्र आहे. मात्र, पक्षांतर्गत नाराजी आणि भविष्यातील राजकीय वाटचालीवरून खल सुरू असल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीतील जागावाटप, आगामी निवडणुका आणि पक्षाच्या अस्तित्वाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले आहे, असे समोर आले आहे.

एका गटाचे मत आहे की, पक्षाचे राजकीय अस्तित्व मजबूत ठेवण्यासाठी आणि भाजपविरोधातील लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी काँग्रेससोबत विलीन होण्याचा पर्याय विचारात घ्यावा. या निर्णयामुळे विरोधकांची ताकद वाढेल आणि आगामी निवडणुकांमध्ये चांगले राजकीय समीकरण तयार होऊ शकते, असा या गटाचा दावा आहे.

तर दुसरा गट पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या बाजूने आहे. शरद पवार यांनी उभारलेल्या पक्षाची ओळख कायम ठेवावी, अशी या नेत्यांची भूमिका आहे. काही नेत्यांच्या मते, बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करून सत्ताधारी आघाडीत सहभागी होण्याचा पर्यायही खुला ठेवला पाहिजे. सत्तेत गेल्यास संघटन मजबूत करण्यास मदत होईल, असा या गटाचा युक्तिवाद आहे.

या दोन मतप्रवाहांमुळे पक्षांतर्गत चर्चांना वेग आला आहे. वरिष्ठ नेत्यांकडून सर्व बाजू समजून घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. सध्या कोणतेही मोठे ‘ऑपरेशन’ प्रत्यक्षात सुरू नसले तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भविष्यातील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही