Share

Maharashtra Solar Scheme: फक्त 2,500 रुपयांत घरावर सोलर! वीज बिल होणार शून्य

महाराष्ट्र सरकारच्या स्मार्ट सोलर योजनेत पात्र ग्राहकांना फक्त 2,500 रुपयांत घरावर सोलर बसवून वीज बिल मोठ्या प्रमाणात कमी करण्याची संधी मिळणार आहे.

Published On: 

Maharashtra Solar Scheme: फक्त 2,500 रुपयांत घरावर सोलर! वीज बिल होणार शून्य

Solar Scheme: महिन्याला येणाऱ्या वाढत्या वीज बिलामुळे (Electricity Bill) त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने घरगुती ग्राहकांसाठी अशी योजना सुरू केली आहे, ज्यामुळे कमी खर्चात घरावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवता येणार आहे. महावितरणकडून ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार (स्मार्ट)’ योजना राबवली जात आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसोबत (PM Surya Ghar Yojana) राज्य सरकारकडून (State Government) अतिरिक्त अनुदान दिले जात असल्याने सोलर बसवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

सोलर पॅनल बसवल्यानंतर घरातील वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. तसेच गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाल्यास ती महावितरणला विकून उत्पन्न मिळवण्याची संधीही ग्राहकांना मिळू शकते.

2,500 रुपयांत सोलर कसा बसणार?

एक किलोवॅट क्षमतेचा सोलर प्रकल्प बसवण्यासाठी साधारण 50 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यासाठी केंद्र सरकारकडून 30 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. यानंतर दारिद्र्यरेषेखालील (BPL) लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त 17 हजार 500 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे पात्र ग्राहकांना स्वतःच्या खिशातून केवळ 2,500 रुपये भरावे लागतील.

इतर ग्राहकांनाही मिळणार अनुदान

अनुसूचित जाती आणि जमातीतील लाभार्थ्यांना अतिरिक्त 30 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ग्राहकांना 20 टक्के अतिरिक्त मदत मिळणार आहे. या सवलतीमुळे अनेक ग्राहकांना 5 ते 10 हजार रुपयांच्या खर्चात सोलर प्रकल्प बसवणे शक्य होणार आहे.

नागपूर-वर्ध्यात लाखो ग्राहक पात्र

महावितरणच्या माहितीनुसार, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 79 हजार 796 ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. यामध्ये नागपूरमधील 2 लाख 73 हजार 508 आणि वर्ध्यातील 1 लाख 6 हजार 338 ग्राहकांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात 16 हजारांहून अधिक ग्राहकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

कोण करू शकतो अर्ज?

  • घरगुती वीज ग्राहक असणे आवश्यक आहे.
  • घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी पुरेशी जागा असावी.
  • वैध वीज कनेक्शन असणे गरजेचे आहे.
  • यापूर्वी कोणत्याही सौर अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
  • मासिक सरासरी वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी असावा.

अर्ज कुठे करायचा?

पात्र ग्राहकांना राष्ट्रीय सौर पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर राबवली जाणार असल्याने लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योजनेअंतर्गत वापरण्यात येणारे सोलर मॉड्यूल्स भारतीय बनावटीचे आणि प्रमाणित असतील. तसेच ग्राहकांना पाच वर्षांसाठी मोफत देखभाल आणि दुरुस्तीची सुविधाही मिळणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही