🕒 1 min read
मुंबई: सध्या डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतीत नांगरणी, मशागत करणे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या खूपच अडचणीचे ठरत आहे. वाढत्या डिझेल खर्चामुळे उत्पादन खर्च वाढत असला, तरी त्या प्रमाणात शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या ( Electric Tractor ) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या या नवीन योजनेनुसार, शेतकरी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी केल्यास त्यांना 1.5 लाख रुपयांचे अनुदान मिळेल. या अनुदानामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होईल आणि त्यांना आधुनिक शेतीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल. या निर्णयाचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतीत नवी क्रांती घडतील असा विश्वास आहे.
Maharashtra Electric Tractor Get ₹1.5 Subsidy
केवळ अनुदानच नाही, तर राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या (Annasaheb Patil Economic Development Corporation) माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी व्याजमुक्त कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुरुवातीला येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करणे सोपे होणार आहे.
इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा खर्च (operating cost) तब्बल 60 ते 70 टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज आहे. सध्या अनेक भागांत एक एकर नांगरणीसाठी २००० ते ३००० ( काही शहरात जास्त ) रुपये खर्च येतो. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या ( Electric Tractor ) वापरामुळे हा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल आणि शेतकऱ्यांना अधिक नफा कमावता येईल.
या सरकारी निर्णयामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन त्यांचे उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं…हे सगळे दुटप्पी लोक” फडणवीसांचा ठाकरेंना चिमटा
- देवेंद्र फडणवीस मंचावर असताना सरन्यायाधीश गवईंकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक
- मोदींना मोठा धक्का! “तुमचा दंड BCCI का भरेल?” सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now







