🕒 1 min read
e-KYC Update : रेशन कार्डधारकांसाठी सरकारने e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. लाभार्थ्यांची माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. रेशनचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी वेळेत e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
सरकारने e-KYC साठी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. मोबाईलवरून प्रक्रिया करता न येणाऱ्या नागरिकांना जवळच्या रेशन दुकानात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) येथे जाऊन अंगठ्याच्या ठशाद्वारे KYC पूर्ण करता येणार आहे.
दर 5 वर्षांनी e-KYC अपडेट करणे आवश्यक
नवीन नियमानुसार रेशन कार्डधारकांना दर पाच वर्षांनी e-KYC अपडेट करावे लागणार आहे. अनेक लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया काही वर्षांपूर्वी पूर्ण केली होती, त्यामुळे आता पुन्हा KYC अपडेट करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.यामुळे सरकारी योजनेचा लाभ योग्य आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
मोबाईलवरून रेशन कार्ड e-KYC कशी कराल?
- आपल्या मोबाईलवर मेरा KYC आणि आधार फेसआरडी ॲप इन्स्टॉल करा.
- यानंतर, ॲप उघडल्यानंतर आपले लोकेशन टाका
- यानंतर आपला आधार क्रमांक टाका, कॅप्चा भरा.
- मोबाइल फोनवर प्राप्त झालेल्या OTP सह पडताळणी पूर्ण करा.
- व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर आधारशी संबंधित माहिती स्क्रीनवर दिसेल येथून फेस e-KYC पर्याय निवडा.
- कॅमेरा आपोआप चालू होईल.
- जिथे तुम्हाला तुमचा चेहरा स्कॅन करायचा आहे किंवा फोटो काढायचा आहे.
- फोटो क्लिक केल्यानंतर सबमिटवर टॅप करा.
ही संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत घरबसल्या पूर्ण करता येणार आहे.
e-KYC पूर्ण झाली की नाही हे कसे तपासाल?
e-KYC ची स्थिती तपासण्यासाठी पुन्हा मेरा KYC ॲप उघडा. त्यानंतर लोकेशन, आधार क्रमांक, कॅप्चा आणि OTP टाकून लॉगिन करा. स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टेटसमध्ये “Y” दिसल्यास e-KYC पूर्ण झाल्याचे समजते. तर “N” दिसल्यास प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
ऑफलाइन पद्धतीनेही करता येणार e-KYC
ज्या नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया करताना अडचणी येत आहेत, ते जवळच्या रेशन दुकानात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSC केंद्रावर जाऊन e-KYC पूर्ण करू शकतात. यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प केवळ ‘अंकगणित’; ‘भाजपचे नियोजन, जनतेचे शोषण’ – नितीन राऊतांची टीका
- ‘शिंदे राम, फडणवीस लक्ष्मण’; शिवसेना मोठा भाऊ असल्याच्या वक्तव्याने महायुतीत नवा वाद
- शिवप्रेमींसाठी गुडन्यूज! किल्ले रायगडावर सरकारी रोप-वेला मंजुरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











