Share

‘शिंदे राम, फडणवीस लक्ष्मण’; शिवसेना मोठा भाऊ असल्याच्या वक्तव्याने महायुतीत नवा वाद

शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदेंना राम आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष्मणाची उपमा देत शिवसेना राज्यात मोठा भाऊ असल्याचे म्हटल्याने महायुतीत नवा वाद निर्माण झाला आहे.

Published On: 

'शिंदे राम, फडणवीस लक्ष्मण'; शिवसेना मोठा भाऊ असल्याच्या वक्तव्याने महायुतीत नवा वाद

मुंबई : महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना (शिंदे गट)च्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे झालेल्या कार्यक्रमानंतर ज्योती वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राम आहेत आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे लक्ष्मण आहेत. तसेच राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचे संकेत दिले.

‘शिवसेनाच राज्यात मोठा पक्ष’

महायुतीमध्ये सध्या मोठा पक्ष कोण, यावर राजकीय चर्चा सुरू आहेत. शिवसेनेचे काही खासदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर या मुद्द्याला अधिक हवा मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्योती वाघमारे यांनी शिवसेना हा राज्यातील मोठा पक्ष असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या या विधानामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील मोठ्या भावाच्या भूमिकेवरून सुरू असलेली चर्चा पुन्हा रंगली आहे.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवरही निशाणा

ज्योती वाघमारे यांनी विरोधकांवरही टीका केली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना त्यांची तुलना रावणाशी केली, तर संजय राऊत यांना कैकयीची उपमा दिली.

भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

ज्योती वाघमारे यांच्या वक्तव्यानंतर महायुतीतील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना आणि भाजपकडून या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही