Share

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! ट्रक-कॉरच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर ट्रक आणि वॅगनार कारच्या भीषण धडकेत चंद्रपूरमधील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला.

Published On: 

Truck Car Accident

अमरावती :  जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. या दुर्घटनेत ट्रक आणि वॅगनार कारची (Wagon r Car) जोरदार धडक होऊन कारमधील पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Amravati Truck Car Accident)

हा अपघात समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 104 जवळ झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

कारमधील सर्व प्रवासी चंद्रपूरचे रहिवासी

मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेले सर्व प्रवासी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील रहिवासी होते. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा समावेश असल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका कायम

नागपूर ते मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग देशातील महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक आहे. मात्र, गेल्या काही काळात या महामार्गावर वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. वेग, वाहनचालकांचा निष्काळजीपणा आणि इतर कारणांमुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही