सातारा बँक निवडणूक: ‘आम्ही दमाची भाषा करत नाही’, जयकुमार गोरेंच्या टीकेवर शंभूराज देसाईंचा पलटवार

सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री जयकुमार गोरे यांच्या ‘जालीम औषध’ आणि ‘दमाची भाषा’ या वक्तव्यांवर शंभूराज देसाई यांनी जोरदार पलटवार केला आहे.

Published On: 

Shambhuraj Desai and Jaykumar Gore political clash

प्रतिनिधी, 22 नोव्हेंबर: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. जयकुमार गोरे यांनी केलेल्या ‘जालीम औषध’ आणि ‘दमाची भाषा’ या वक्तव्यांवर शंभूराज देसाई यांनी जोरदार पलटवार करत थेट जाहीर चर्चेची तयारी दर्शवली आहे.

गोरे यांच्या जालीम औषधाच्या विधानावर मिश्कील टोला लगावताना देसाई म्हणाले की, हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे गोरे यांनाच विचारावे लागेल. त्यांना जर या इलाजाचा फायदा झाला असेल, तर मी त्यांच्याकडून नक्कीच माहिती घेईन.

‘दम होता तर निवडणूक लढवायची’ या गोरे यांच्या आव्हानावर देसाईंनी स्पष्ट केले की, आम्ही कधीही दमाची भाषा करत नाही. मात्र कोणी जाणीवपूर्वक असे बोलत असेल, तर आकडेवारी सर्वकाही स्पष्ट करते. तालुक्यातील ११ पैकी ७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीने विजय मिळवला असून, जिल्हा गटातील ५ जागांवरही हेच ठरावधारक मतदान करणार असल्याने आपली बाजू भक्कम असल्याचा दावा त्यांनी केला.

महायुतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आल्याने महायुतीतील सर्वच पक्ष आनंदित आहेत. तसेच स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर बोलताना, जयकुमार गोरे हे मंत्रिमंडळातील आपले सहकारी असल्याने त्यांच्यावर अधिक भाष्य करणार नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले.

राजकीय विषयावर न बोलण्याचे ठरवले होते, परंतु पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्यामुळे मौन बाळगणे योग्य वाटले नाही, कारण आपल्याला उघडपणे बोलण्याची सवय असल्याचे शंभूराज देसाई यांनी नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही