Share

‘मराठीला हलक्यात घेऊ नका’; हिंदीतून ऑफर असूनही श्रेयस तळपदेने ‘मर्दिनी’ मराठीतच का बनवला? सांगितला किस्सा

बॉलिवूडमधून हिंदीत सिनेमा करण्याची मागणी होत असतानाही श्रेयस तळपदेने ‘मर्दिनी’ हा विषय मराठीतच करण्याचा निर्णय घेतल्याचा अनुभव सांगितला.

Published On: 

Mardini

Shreyas Talpade On Marathi Films Exclusive : हिंदी (Hindi) आणि मराठी (Marathi) चित्रपटसृष्टीमध्ये अनेकदा तुलना आणि स्पर्धा पाहायला मिळते. अलीकडच्या काळात अनेक मराठी सिनेमांनी (Marathi Movies) दमदार कथा आणि दर्जेदार सादरीकरणाच्या जोरावर प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मोठ्या हिंदी स्टारकास्टच्या चित्रपटांसोबतही मराठी सिनेमांना थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीकडून अनेकदा मराठी सिनेमांकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते, अशी खंत अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याने व्यक्त केली आहे.

‘मर्दिनी’साठी हिंदी ऑफर नाकारली

आगामी मराठी चित्रपट ‘मर्दिनी’च्या (Mardini) निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत श्रेयस तळपदेने या चित्रपटाच्या निर्मितीमागचा अनुभव सांगितला. श्रेयस म्हणाला की, अनेकदा हिंदी चित्रपटांसाठी एखादा विषय निवडला की लोक म्हणायचे, “हा विषय मराठीत चालेल.” म्हणजेच मराठी प्रेक्षकांसाठीच असे विषय योग्य आहेत, असा एक समज असल्याचे त्याने सांगितले.

‘मर्दिनी’चा विषय समोर आल्यानंतर अनेकांनी हा चित्रपट हिंदीमध्ये केला तर तो पॅन इंडिया स्तरावर पोहोचू शकतो, असा सल्ला दिला होता. मात्र, श्रेयसने हा विषय मराठीतच करण्याचा निर्णय घेतला.

“माझी सुरुवात मराठीतून झाली, त्यामुळे सिनेमा देखील मराठीतच”

“माझी सुरुवात मराठी सिनेमातून झाली आहे. हा विषय मला मराठीतून मिळाला आहे, त्यामुळे हा सिनेमा देखील मराठीतूनच करणार. मराठी प्रेक्षकांना दर्जेदार, मनोरंजक आणि वेगळ्या विषयांवर आधारित सिनेमे मिळायला हवेत. मराठी इंडस्ट्री वाढली तर कलाकारांनाही मोठ्या संधी मिळतील.” असे मत त्याने व्यक्त केले.

‘मर्दिनी’ची कथा काय?

‘मर्दिनी’ हा आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित चित्रपट आहे. संकटात सापडलेल्या आपल्या मुलीसाठी एक सामान्य स्त्री कशा प्रकारे धैर्य दाखवते आणि मर्दिनी रूप धारण करते, ही कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. या चित्रपटात प्रार्थना बेहेरे मुख्य भूमिकेत आहे. अभिजीत खांडकेकर आणि जितेंद्र जोशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच बालकलाकार मायरा वायकुळ देखील या चित्रपटाचा भाग आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही