Share

1 July New Rules: खिशावर परिणाम करणारे 5 मोठे बदल; जाणून घ्या नवीन नियम

1 जुलै 2026 पासून आधार, पासपोर्ट, रेल्वे, क्रेडिट कार्ड आणि इंधन दरांशी संबंधित 5 मोठे बदल लागू होण्याची शक्यता आहे.

Published On: 

New Rules

🕒 1 min read

मुंबई : नवीन महिन्याच्या सुरुवातीला देशभरात काही महत्त्वाचे नियम आणि शुल्कांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 1 जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक नियोजनावर होऊ शकतो.

या बदलांमध्ये आधार अपडेट सेवा, पासपोर्ट शुल्क, क्रेडिट कार्डचे नियम, रेल्वेतील दंड व्यवस्था तसेच एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी या नव्या नियमांची माहिती घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

1) आधार अपडेट सेवा मोफत होण्याची शक्यता

आधार कार्डधारकांसाठी दिलासादायक निर्णय होण्याची शक्यता आहे. UIDAI कडून 1 जुलै 2026 पासून पुढील काही महिन्यांसाठी आधार अपडेट सेवा मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर किंवा ई-मेलसारख्या वैयक्तिक माहितीत बदल करण्यासाठी नागरिकांना शुल्क भरावे लागणार नाही. यापूर्वी अशा अपडेटसाठी शुल्क आकारले जात होते.

2) पासपोर्ट शुल्कात वाढ होणार

परदेश प्रवास किंवा शिक्षणासाठी पासपोर्ट आवश्यक असलेल्या नागरिकांसाठी खर्च वाढण्याची शक्यता आहे. नवीन नियमानुसार पासपोर्ट शुल्कात वाढ करण्यात येणार आहे. 36 पानांच्या सामान्य पासपोर्टसाठी शुल्क 1500 रुपयांवरून 2500 रुपये होणार असल्याची माहिती आहे. तर तत्काळ पासपोर्ट सेवेसाठीही शुल्क वाढण्याची शक्यता आहे. 60 पानांच्या जंबो पासपोर्टसाठीही नागरिकांना अधिक शुल्क भरावे लागू शकते. या पासपोर्टचे शुल्क वाढवून 6000 रुपये करण्यात आले आहे. या बदलामुळे नवीन पासपोर्ट काढणाऱ्या आणि नूतनीकरण करणाऱ्या नागरिकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

3) HDFC क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल

1 जुलै 2026 पासून HDFC बँकेच्या काही क्रेडिट कार्डधारकांसाठी नवीन नियम लागू होणार आहेत. Regalia Gold आणि Diners Club Privilege कार्डवरील एअरपोर्ट लाउंज सुविधेसाठी अटी अधिक कठोर करण्यात येणार आहेत. मोफत लाउंज सुविधा मिळवण्यासाठी ग्राहकांना मागील तिमाहीत ठराविक रकमेचे व्यवहार करणे आवश्यक असेल. Regalia Gold कार्डधारकांना पुढील तिमाहीतील लाउंज सुविधा मिळवण्यासाठी मागील तिमाहीत 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या ग्राहकांवर या बदलाचा परिणाम होऊ शकतो.

4) रेल्वेच्या दंड नियमांमध्ये बदल

रेल्वे प्रवाशांसाठीही महत्त्वाचा बदल होणार आहे. विनातिकीट प्रवास आणि नियमभंग करणाऱ्या प्रवाशांवरील दंडाची रक्कम वाढवण्यात येणार आहे. विनातिकीट प्रवासासाठी असलेला दंड 250 रुपयांवरून 500 रुपये करण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी राखीव डब्यात अनधिकृत प्रवास करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे. रेल्वेतील शिस्त आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे बदल करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

5) LPG, CNG आणि PNG च्या दरांमध्ये बदलाची शक्यता

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांकडून इंधन दरांचा आढावा घेतला जातो. त्यामुळे 1 जुलैपासून घरगुती एलपीजी सिलिंडर, व्यावसायिक गॅस सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दर वाढल्यास घरगुती बजेटवर परिणाम होऊ शकतो, तर दर कमी झाल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकतो. याशिवाय विमान इंधनाच्या (ATF) दरांमध्येही बदल झाल्यास विमान प्रवासाच्या तिकिटांच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही