Share

Breaking News : ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी?

खासदार बजरंग सोनवणे यांच्या फडणवीस भेटीनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा सुरू झाली असताना रोहित पवारांनी राष्ट्रवादीचा एकही खासदार फुटणार नसल्याचा दावा केला.

Published On: 

ब्रेकिंग न्यूज : ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी?

शिवसेना गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटातील ९ पैकी ६ खासदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत. या फुटीनंतर ठाकरे गटाकडे आता केवळ ३ खासदार उरले आहेत, तर शिंदे गटातील खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे.

खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे संबंधित लोकसभा मतदारसंघांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. शिवसेनेतील या घडामोडींना ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) म्हटले जात असताना आता महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन तुतारी’ची (Operation Tutari) चर्चा सुरू झाली आहे.

‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चेदरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane)  यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित (Rohit Pawar) पवार यांनी प्रतिक्रिया देत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा एकही खासदार फुटणार नसल्याचा दावा केला.

रोहित पवार म्हणाले की, काही खासदारांना पक्ष सोडण्यासाठी लक्ष्य केले जाऊ शकते, मात्र आमचे खासदार पक्षासोबत ठामपणे राहतील. सीमांकन (Delimitation) प्रक्रियेसाठी भाजपला आणखी ४१ खासदारांची गरज आहे. पण अशा प्रकारच्या घडामोडी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी रोहित पवार सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यात ‘ऑपरेशन तुतारी’सारखी कोणतीही राजकीय मोहीम होणार नाही, असा दावा रोहित पवार यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही