Share

गडचिरोलीतील सर्पदंशाने ३ विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्री फडणवीसांनी मागवला अहवाल

गडचिरोली आश्रम शाळा सर्पदंश प्रकरणात ३ विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे.

Published On: 

CM Fadnavis reacts to snakebite deaths

मुंबई : शरद पवारांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेणार आहे, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. फडणवीस म्हणाले की, एखाद्या खासदाराने मोदींची भेट घेण्यात काहीही गैर नाही. पंतप्रधानांना विरोधी पक्षांचे नेते आपल्या कामासंदर्भात भेटत असतात. मलाही अनेक विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. त्यामुळे, या घटनेकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

जर खासदार त्यांना भेटायला गेला असेल किंवा जाणार असेल, तर ती एक अत्यंत सकारात्मक बाब आहे. सध्या देशभरात ‘तिरंगा रॅली’चे आयोजन केले जात असल्याचे फडणवीसांनी नमूद केले.

गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) ‘जपतलाई निवासी आश्रम शाळेत’ तीन मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Fadnavis) यांनी भाष्य केले. ते गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. या घटनेची दखल घेत फडणवीस म्हणाले की, “मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे. अशी बातमी मलाही मिळालेली आहे. यासंदर्भात अधिकची माहिती मी मागवली आहे.”

CM Fadnavis reacts to snakebite deaths

देशभक्तीची भावना पसरविण्यासाठी ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण राज्यात, देशात तिरंगा रॅली होत आहे. फडणवीस यांनी एफसीआरए (FCRA – परदेशी योगदान नियमन कायदा) बाबतही एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी नमूद केले की काही संस्था एफसीआरएच्या तरतुदींचा वापर करून निधी मिळवत आहेत.

जर याच्यावर कोणाला काही म्हणायचे असेल तर संसदेत बोलू शकतात. यात कोणत्याही एका समुदायाचा विषयच नाही. फक्त ख्रिश्चन समाजासाठी हे नाहीये. सर्व संस्थांसाठी हे आवश्यक आहे. त्यात सर्व समाजाच्या संस्था आहेत. बऱ्याच लोकांना FCRA बिल येत आहे, याची मिरची लागली. याचा अर्थ काय आहे?

“मी पुन्हा एकदा सांगतो की, केंदातले सरकार सर्वांचे म्हणणे ऐकणारे सरकार आहे. कोणत्याही संस्थेला परदेशातून पैसे घ्यायचे असतील तर FCRA ची परवानगी घ्यावी लागेल. FCRA च्या मुद्द्यातून संसदेत गोंधळ होण्याची शक्यता आहे.” असे फडणवीसांनी सांगितले.

अमेरिकेतूनही जोरदार विरोध होत आहे. अमेरिकेच्या एका खासदारानेही FCRA च्या मुद्द्यात भारताला मोठी धमकी देत जर हे बिल पास झाले तर भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम होईल, अशी मोठी धमकी दिली असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही