दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा असून, या काळात महत्त्वपूर्ण घडामोडी अपेक्षित आहेत. सत्ताधारी पक्ष आज संसदेत महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यावर भर देणार आहे. तसेच, ‘सीमांकन विधेयक’ (Delimitation Bill) नव्याने मांडले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनंतर, आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे खासदारही पंतप्रधान मोदींची (PM Modi)भेट घेणार आहेत. ही भेट आज सकाळी ११:०० च्या सुमारास होण्याची शक्यता असून सर्वांचे लक्ष या घटनेकडे लागले आहे.
संसदेत सीमांकन विधेयक मांडले जाणार असल्याने या घडामोडींकडे सर्वांचे बारीक लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर, नियोजित भेट राष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत या भेटीची माहिती दिली, तसेच रोहित पवार यांनीही यावर भाष्य केले.
Sharad Pawar MPs meeting PM Modi in Delhi
शरद पवार गटाचे खासदार सीमांकन प्रस्तावाच्या विरोधात मतदान करतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. खासदारांच्या मतदारसंघातील रखडलेले विकास प्रकल्प आणि जनहिताचे मुद्दे यांवर या भेटीत चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
या भेटीत सहभागी होणारे खासदार : सुप्रिया सुळे (बारामती), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), अमर काळे (वर्धा), निलेश लंके (अहमदनगर), बाळ्यामामा /सुरेश म्हात्रे (भिवंडी), धैर्यशील मोहिते-पाटील (माढा), भास्कर भगरे (दिंडोरी) आणि बजरंग सोनवणे (बीड).
लोकसभेत दोन विधेयके मांडली जाणार
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातही संसदेचे कामकाज विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अधिवेशनाला उपस्थित राहणे टाळले आहे, ज्यावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
गोंधळामुळे गेल्या काही दिवसांत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले आहे. शिवाय, या आठवड्यात लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे.
यामध्ये केरळ राज्याचे नाव बदलून ‘केरळम’ (Keralam) करण्याबाबतचे विधेयक आणि ‘राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ कायद्या’त (National Cooperative Development Corporation Act) सुधारणा करण्याबाबतच्या विधेयकाचा समावेश आहे. या दोन्ही विधेयकांकडे विशेष लक्ष असेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘नीट’चा फुलफॉर्म माहीत नसताना आंदोलने का? प्रशांत दामलेंचा सवाल
- पावसाची दडी संपणार? ‘एल निनो’च्या सावटात मान्सूनला नवं बळ!
- नरेंद्र पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट: ‘ते’ अधिकारी सरकार आणि मराठा समाजात अंतर वाढवतायत?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












