Prashant Damle Slams Gen Z: तुम्हाला ‘नीट’ (NEET) चा फुलफॉर्म माहितीये का? नसला तर आधी तो समजून घ्या आणि मगच आंदोलनात उतरा! होय, अगदी असाच थेट सल्ला दिलाय ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी. आजकालची तरुणाई म्हणजेच ‘जेन झी’ (Gen Z) काहीशी उतावीळ झाली आहे का, यावर त्यांनी नेमकं बोट ठेवलंय.
२५ जुलै २०२५ रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या नेतृत्वात ‘जेन झी’ ने केलेलं आंदोलन चांगलंच चर्चेत राहिलं. या आंदोलनादरम्यान प्रशांत दामलेंनी एक व्हिडीओ शेअर करत तरुणांना सामोपचाराने प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं होतं. आता याच निमित्ताने त्यांनी आजच्या पिढीवर परखड भाष्य केलं आहे.
Prashant Damle : Gen Z ची ‘अर्धवट माहितीवर गाडी सुसाट’
एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, ‘आजच्या पिढीला सगळं झटपट हवंय. विचारलेला प्रश्न आणि दोन दिवसांनी मिळालेलं उत्तर त्यांना अजिबात चालत नाही. कारण त्यांचा वेग प्रचंड आहे. पण नेमकी गोम इथेच आहे’.
५० पैकी ४० तरुण केवळ अर्धवट माहितीच्या जोरावर आपली गाडी ढकलत असतात. उरलेले १० जणच खऱ्या अर्थाने अभ्यास करून बोलणारे असतात. त्यामुळे शासनाने किंवा निर्णय घेणाऱ्यांनी हे १० जण कोण आहेत, हे आधी ओळखायला हवं.
त्यांनी स्वतःच्या तरुणपणीचा काळ आणि आजचा काळ याची तुलना केली. १९७६ साली जेव्हा ते दहावीला होते, तेव्हा माहितीचे मोजकेच स्रोत होते. आता मात्र गुगलसारखी हत्यारं हाती असल्याने आजची पिढी खूप माहितीगार आहे. समूहाने एकत्र येऊन लवकर यश मिळवण्याची त्यांची वृत्ती असते.
Gen Z ला ‘नीट’चा फुलफॉर्म तरी माहीत आहे का?
दुसरीकडे, घरातील ‘जेन झी’ म्हणजे स्वतःच्या मुलींसोबत ते अजिबात वाद घालत नाहीत. केवळ ऐकून घेण्याची तयारी ठेवतात. पण समाजातील तरुणांना मिळालेल्या अतिस्वातंत्र्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. “नीटचा फुलफॉर्म माहीत नसताना निव्वळ घोषणाबाजी करण्यात काय अर्थ?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कोणतीही गोष्ट करायची असेल, तर त्याचं पूर्ण ज्ञान असणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- पावसाची दडी संपणार? ‘एल निनो’च्या सावटात मान्सूनला नवं बळ!
- नरेंद्र पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट: ‘ते’ अधिकारी सरकार आणि मराठा समाजात अंतर वाढवतायत?
- राष्ट्रवादीला अर्थखातं मिळणार नाही; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










