Share

‘गटारातून आलेल्यांनाच दुसऱ्यांची लायकी कळते’, कंगनाच्या ‘त्या’ विधानावर रेणुका चौधरींचा संताप, नेमकं काय म्हणाल्या?

जेन झी तरुणींना ‘गटर छाप’ म्हणणाऱ्या कंगना रणौतवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी सडकून टीका करत भाजपलाही थेट इशारा दिला आहे.

Published On: 

Congress MP Renuka Chowdhury criticizing BJP MP Kangana Ranaut outside parliament

‘गटर जनरेशन’ म्हणत देशातल्या तरुणींचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला (Kangana Ranaut) आता संसदेच्या पायऱ्यांवरूनच थेट आणि खुलं आव्हान मिळालं आहे. स्वतःला संस्कारी म्हणवून घेणाऱ्या कंगनाला आता काँग्रेसच्या ज्येष्ठ खासदार रेणुका चौधरी (Renuka Chowdhury) यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत सुनावले आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना रेणुका चौधरी यांनी कंगनाचा खरपूस समाचार घेतला. सीजेपी (CJP) आंदोलनात सहभागी झालेल्या ‘जेन झी’ (Gen Z) तरुणींना कंगनाने ‘गटर छाप’ म्हटलं होतं. यावरून आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेसने थेट भाजपवर निशाणा साधला आहे.

Renuka Chowdhury on Kangana Ranaut

काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी आक्रमक होत कंगनाच्या थेट पात्रतेवरच बोट ठेवलं. “केवळ गटारातून आलेले लोकच ओळखू शकतात की, आणखी कोण गटारातून आलंय आणि कोण नाही,” असा सणसणीत घणाघात त्यांनी केला. एवढंच नाही तर, स्वतःला उत्तम गृहिणी म्हणवून घेण्यासाठी कंगनाकडे कोणतं प्रमाणपत्र आहे? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी विचारला.

संसदेत सरकारचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि स्वतःची प्रशंसा करून घेण्यासाठी कंगना अशी वक्तव्ये करत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. “भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात कसं वागतं, हे कंगनाला लवकरच समजेल,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला. आपण या लोकांकडूनच शिकत असून याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही त्या म्हणाल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी कंगनाने इन्स्टाग्रामवर एका पोस्टमधून हिंदू तरुणींवर अत्यंत गलिच्छ शब्दांत टीका केली होती. आई-बापाच्या पैशांवर जगणाऱ्या या मुली दारू पितात आणि अनेकांशी शारीरिक संबंध ठेवतात, अशी मुक्ताफळे तिने उधळली होती. त्यामुळेच आता कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही