Share

ठाकरेंचा नवा राजकीय रणसंग्राम! “भाजपमुक्त रामासाठी आंदोलन करणार”

यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधत “भाजपमुक्त राम पाहिजे” म्हणत नव्या आंदोलनाची घोषणा केली.

Published On: 

uddhav thackeray

🕒 1 min read

यवतमाळ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या यवतमाळ (Yavatmal) दौऱ्यावर आहे. ठाकरे गटातून फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघांना भेटी देत आहेत. नुकतेच ठाकरे गटाचे ९ पैकी ६ खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष संघटना कमकुवत होऊ नये आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कायम राहावा, यासाठी उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघांमध्ये दौरे सुरू केले आहेत.

यवतमाळ येथील सभेत उद्धव ठाकरेंनी फुटलेल्या खासदारांवर निशाणा साधतानाच भाजपवरही (BJP) जोरदार टीका केली. अयोध्येतील राम मंदिरातील (Ayodhya Ram Mandir)  कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपला लक्ष्य केले. या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने एसआयटी (SIT) चौकशी सुरू केली असून, त्याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले.

हिंदूंनी जागरूक होण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून टीका केली. “भाजपमुक्त राम पाहिजे, त्यासाठी आम्ही आंदोलन उभारणार आहोत. रामाला या विळख्यातून मुक्त करणार, भोंदूंपासून रामाची सुटका करणार,” अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. या आंदोलनाची पहिली ठिणगी महाराष्ट्रातून शिवसेना टाकेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

“पिकविमा का मिळाला नाही? लोकसभेत तोंड उघडू शकता का? गद्दारांना विचारा. राम मंदिर लुटले जात आहे, हे सर्व प्रश्न विचारण्याचे धाडस या गद्दारांमध्ये आहे का? की गद्दारीने तुमचे रक्त नासले का? शिवसेना संपवण्याचा प्रयत्न का केला जात आहे, कारण कोणालाही प्रश्न विचारले जाऊ नयेत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“इथे वाघाचे जीवन जगत होते. तिकडे गाढवाचे जीवन जगा. जे लादले जाईल ते वाहत राहा. शिवसेना ही प्रेम देणारी संघटना आहे. या संघर्षात मी लढणार आहे. तुम्ही माझ्यासोबत उभे राहणार का? आपलं हिंदूत्व माणुसकी लुटणारं आहे. मंदीर लुटणारं नाही,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही