Share

देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे एकाच विमानात; राजकीय वर्तुळात खळबळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई ते नागपूर एकाच विमानातून प्रवास केला. प्रवासादरम्यान झालेल्या चर्चेमुळे राजकीय चर्चांना वेग आला.

Published On: 

देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे एकाच विमानात; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आणणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानातून प्रवास केला. या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानात उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे (Aditya Tahckeray), संजय राऊत (Sanjay Raut), विनायक राऊत (Vinayak Raut) आणि अनिल देसाई (Anil Desai) हे नेते उपस्थित होते.

राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि ठाकरे यांचा एकत्र प्रवास विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस केल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊत यांच्यातही चर्चा झाल्याची माहिती आहे.

2019 नंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल झाले. अलीकडील काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मधील खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदारसंघांमध्ये दौरे करण्याचा निर्णय घेतला आहे. 27 जून रोजी उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ-वाशिम दौरा असून त्यासाठी ते नागपूरला जायला निघाले.

“आपण भेटलो हीच मोठी बातमी आहे” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना म्हणाल्याची माहिती आहे. त्यामुळे याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही