Share

‘ऑपरेशन टायगर 3.0’ सुरूच! ठाकरेंचे १४ आमदार फुटणार? शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ

ठाकरे गटातील १४ आमदार शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Published On: 

‘ऑपरेशन टायगर 3.0’ सुरूच! ठाकरेंचे १४ आमदार फुटणार? शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेनेतील फुटीच्या चर्चांना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ठाकरे गटातील १४ हून अधिक आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करू शकतात, असा दावा केला आहे. गुलाबराव पाटील यांनी ‘ऑपरेशन टायगर 3.0’ (Operation Tiger 3.0) अजूनही सुरू असल्याचे सांगितले. ठाकरे गटातील अनेक आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करत त्यांनी आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याचे संकेत दिले.

“एकनाथ शिंदे दाढीवर हात फिरवतात आणि ऑपरेशन टायगर यशस्वी होते,” असे सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटातील संभाव्य फुटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

यापूर्वी लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटातील काही खासदारांनी शिंदे गटाची साथ दिल्याने शिवसेनेतील संघर्ष आणखी वाढला होता. आता आमदारांच्या संभाव्य पक्षांतराच्या दाव्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर पुन्हा लक्ष केंद्रित झाले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही