Share

मराठी बोलता आलं नाही तर लायसन्स रद्द होणार! प्रताप सरनाईक यांची माहिती

मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान नसलेल्या ऑटो आणि कॅब चालकांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

Published On: 

Marathi Language rule for taxi and auto drivers 

Marathi Language Rule : वाहनचालकांनो तुम्हाला मराठी भाषा (Marathi Language) बोलता येतं का? मराठी बोलता येत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कॅब (Cab) किंवा ऑटो (Auto) चालवताना प्रवाशांशी मराठीत बोलता येणं बंधनकारक आहे. जर तुम्हाला मराठी बोलता येत नसेल तर तुमचे लायसन्स रद्द केले जाऊ शकते.

ज्या वाहन चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान नाही, त्यांचे लायसन्स निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भातील सरकारी आदेश आज जारी केला जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केली.

Marathi Language rule for taxi and auto drivers 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९’ मध्ये सुधारणा करून ‘अँटीसीडेंट्स’ (antecedents) या शब्दानंतर “आणि मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान” (working knowledge of Marathi language) ही अट समाविष्ट करण्यात आली आहे. परिणामी, वाहन चालवण्याच्या अधिकृत लायसन्ससाठी अर्ज करताना मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असेल.

नवीन नियमांनुसार, जर एखाद्या चालकाकडे मराठीचे आवश्यक ज्ञान नसेल तर त्यांना सुरुवातीला एक महिन्याची मुदत दिली जाईल. या काळात त्यांच्या मराठी भाषेच्या ज्ञानात सुधारणा न झाल्यास, त्यांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाऊ शकते. त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाऊ शकतो.

मंत्री सरनाईक यांनी नमूद केले की, “व्यावसायिक वाहनांच्या चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान असण्याची अट नियमावलीत आधीपासूनच होती, परंतु तिची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नव्हती.”

विशेषतः स्थानिक प्रवाशांची ने-आण करताना भाषेचा अडथळा येऊ नये आणि प्रवाशांशी सुरळीत व प्रभावी संवाद साधता यावा, यासाठी या अटीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

परिवहन विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता या निर्णयाची कायदेशीर अंमलबजावणी केली जाणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही