Share

Donald Trump India News: ट्रेड डीलपूर्वी ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय; भारताच्या 4 कंपन्यांवरील बंदी हटवली

भारत-अमेरिका ट्रेड डीलच्या चर्चेदरम्यान ट्रम्प प्रशासनाने भारतातील चार कंपन्यांना अमेरिकेच्या निर्बंधांच्या यादीतून बाहेर काढत मोठा निर्णय घेतला आहे.

Published On: 

Donald Trump

🕒 1 min read

भारत (India) आणि अमेरिकेतील (America) संबंधांमध्ये मागील काही काळात टॅरिफ (Tariff) वादामुळे तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेने अनेक देशांवर अतिरिक्त शुल्क लावले होते, त्यात भारताकडून रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अतिरिक्त टॅरिफचा मुद्दाही चर्चेत आला होता. या वादाचा परिणाम दोन्ही देशांच्या व्यापार संबंधांवर झाला होता. भारताची अमेरिकन बाजारपेठेतील निर्यातही काही प्रमाणात प्रभावित झाली होती. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी पाकिस्तानशी जवळीक वाढवल्याने भारत-अमेरिका संबंधांमध्ये काही काळ नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, आता दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचे संकेत मिळत आहेत. भारत आणि अमेरिकेतील ट्रेड डील (Trade Deal) अंतिम टप्प्यात असतानाच ट्रम्प प्रशासनाने भारतासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागाने भारतातील चार कंपन्यांवरील निर्बंध हटवले आहेत. या निर्णयामुळे या कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या कंपन्यांवरील बंदी हटवली?

अमेरिकेच्या वित्त विभागाने हैदराबाद येथील RRG Engineering Technologies Private Limited, Lokesh Machines Limited, अहमदाबाद येथील Galaxy Bearings Limited आणि दिल्लीतील Shaurya Aeronautics Private Limited या चार कंपन्यांना निर्बंधांच्या यादीतून बाहेर काढले आहे. या कंपन्यांची नावे अमेरिकेच्या Specially Designated Nationals (SDN) List मधून हटवण्यात आली आहेत. या यादीतील कंपन्या आणि व्यक्तींवर आर्थिक निर्बंध लागू केले जातात तसेच त्यांची मालमत्ता गोठवली जाऊ शकते.

19 भारतीय कंपन्यांवर लावले होते निर्बंध

अमेरिकेच्या Office of Foreign Assets Control (OFAC) ने 2024 मध्ये 19 भारतीय कंपन्या आणि दोन व्यक्तींवर निर्बंध लावले होते. रशियाला मदत करणाऱ्या किंवा रशियन संस्थांशी संबंधित व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवर अमेरिकेकडून ही कारवाई करण्यात आली होती. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध लागू केले होते.

दोन कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड

निर्बंध हटवण्यात आलेल्या चार कंपन्यांपैकी Galaxy Bearings Limited आणि Lokesh Machines Limited या सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपन्या आहेत.  विशेष म्हणजे, Lokesh Machines Limited च्या ग्राहकांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यावसायिक संबंधांना सकारात्मक संकेत मिळत असल्याचे मानले जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही