Share

LPG Price Cut: व्यावसायिक गॅस सिलिंडर 183 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दर

तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमतीत 183.50 रुपयांची कपात केली असून आता तो 2930 रुपयांना मिळणार आहे.

Published On: 

LPG

नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच तेल विपणन कंपन्यांनी LPG सिलिंडरच्या दरात मोठी कपात जाहीर केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या (Cylinder)किमतीत तब्बल 183.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्य व्यवसाय आणि लघुउद्योग चालवणाऱ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (LPG Cylinder Price Cut)

नवीन दरानुसार, 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर (Commercial Cylinder) आता 2930 रुपयांना उपलब्ध होणार आहे. यापूर्वी याची किंमत 3113.50 रुपये होती. गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या LPG दरांमुळे व्यावसायिकांवर आर्थिक ताण वाढला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि मध्यपूर्वेतील भूराजकीय परिस्थितीमुळे LPG दरांवर परिणाम झाला होता. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ पाहायला मिळाली होती.

याआधी मार्च महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात दोन वेळा वाढ करण्यात आली होती. 1 मार्च रोजी 28 रुपयांची तर 7 मार्च रोजी 114.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाल्यानंतरही घरगुती ग्राहकांना अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सध्या मुंबईत घरगुती LPG सिलिंडरची किंमत 941.50 रुपये आहे. 2026 मध्ये व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात झालेली ही पहिली मोठी कपात मानली जात आहे. त्यामुळे आगामी काळात घरगुती सिलिंडरच्या किमतीतही घट होते का, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही