🕒 1 min read
INDIA Alliance News: इंडिया आघाडीतील (INDIA Alliance) फूट पडल्याच्या चर्चांदरम्यान विरोधकांनी (Opposition Unity) पुन्हा एकजुटीचे प्रदर्शन केले आहे. लोकसभा (Loksabha) आणि राज्यसभेत (Rajyasabha) भाजप दोन तृतीयांश बहुमताचा आकडा गाठण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप इंडिया आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीच्या बैठकीला काही प्रमुख पक्ष गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. 8 जून रोजी झालेल्या बैठकीत द्रमुक (Dravida Munnetra Kazhagam (DMK)) आणि आप पार्टी (Aam Aadmi Party (AAP)) सहभागी झाले नव्हते. त्यामुळे आघाडीत मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता इंडिया आघाडीने पुन्हा एकजुटीचा संदेश दिला आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर 23 पक्षांच्या (23 parties) नेत्यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत (Justice SuryaKant) यांना विविध मुद्द्यांवर पत्र पाठवले आहे. (Letter Sent to CJI)
या पत्रावर 23 पक्षांच्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विशेष म्हणजे बैठकीला अनुपस्थित असलेल्या आप आणि द्रमुकच्या नेत्यांनीही या पत्रावर सही केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट असल्याचा दावा कमकुवत झाल्याचे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी या पत्राबाबत माहिती दिली. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी 23 पक्षांच्या नेत्यांसह एका अपक्ष खासदाराचीही सही असल्याचे सांगितले. या पत्रात निवडणूक प्रक्रिया आणि SIR संदर्भातील मुद्द्यांकडे सरन्यायाधीशांचे लक्ष वेधण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत यासंदर्भात पत्र पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानुसार हे पत्र पाठवण्यात आले.
दरम्यान, आप आणि द्रमुकने यापूर्वी काँग्रेसच्या काही भूमिकांवर नाराजी व्यक्त केली होती. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या निर्णयामुळे द्रमुक नाराज असल्याची चर्चा होती. तसेच आपनेही काही मुद्द्यांवर काँग्रेसपासून अंतर ठेवण्याची भूमिका घेतली होती. मात्र, सरन्यायाधीशांना पाठवलेल्या पत्रावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सह्या असल्याने इंडिया आघाडीतील एकजुटीचे संकेत मिळत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- स्पाय उपकरणांचा गैरवापर रोखणार; महाराष्ट्र सरकार स्थापन करणार विशेष समिती
- NCERT पुस्तकातून शिवरायांच्या साम्राज्याचा नकाशा वगळला; डॉ. नितीन राऊतांचा सरकारला जाब
- Maharashtra Weather : राज्यात पावसाचा कहर! उद्या 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












