Share

Rohit Pawar यांचा इंडिया आघाडीवर निशाणा, म्हणाले; “भाजपची ‘बी टीम’प्रमाणेच काम…”

by MHD
Rohit Pawar raised question on INDIA Alliance in Delhi Election

Rohit Pawar । दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Election) पक्षाचा काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्षाला (Aam Aadmi Party) मोठा धक्का बसला. यामुळे राजकीय वर्तुळातून या पक्षांवर टीका केली जात आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करत इंडिया आघाडीवर (INDIA Alliance) निवडणुकीच्या निकालावरून निशाणा साधला आहे.

रोहित पवार X लिहितात, “दिल्लीच्या जंगपुरामध्ये मनीष सिसोदिया ७०० मतांनी पराभूत झाले तर काँग्रेसच्या सुरी यांना ७३५० मते मिळाली. नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल जवळपास ३४०० मतांनी पराभूत झाले, तिथं काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना ४५०० हून अधिक मते मिळाली, कस्तुरबानगरमध्ये काँग्रेस उमेदवाराचा ११००० मतांनी पराभव झाला तर ‘आप’ला १८००० मते मिळाली. २० हून अधिक मतदारसंघात अशीच काहीशी स्थिती आहे,

“दोन्ही पक्षांनी समन्वय साधला नाही, परिणामी अहंकार आणि इगोमुळे दोन्ही पक्ष कळतनकळत भाजपची ‘बी टीम’ प्रमाणेच काम करून गेले, ही शोकांतिका आहे. या निकालातून धडा घेऊन INDIA आघाडीचे नेते किमान यापुढच्या निवडणुका तरी समन्वयाने लढतील का? हा खरा प्रश्न आहे,” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Rohit Pawar on Delhi Election

दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीमधील आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी केली नाही. जर या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली असती तर भाजपसमोर (BJP) मोठे आव्हान निर्माण झाले असते, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये जोरदार सुरू आहे. हरियाणा आणि आता महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमध्ये देखील इंडिया आघाडीच्या पक्षांना मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीमधील आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी केली नाही. यावरून आता Rohit Pawar यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे.

Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now