Gopichand Padalkar । भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सतत वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहत असतात. यामुळे अनेकदा राजकीय वातावरण देखील तापले असल्याचे पाहायला मिळते. अशातच आता त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर जहरी टीका केली आहे.
“जयंत पाटील मला किती विरोध करतोय. जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आहे. जयंत पाटील हे टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात असे मला एक जण म्हणाला. पण आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करू,” असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. (Gopichand Padalkar vs Jayant Patil)
“मी जतमध्ये निवडून येऊ नये म्हणून जयंत पाटील यांनी खूप प्रयत्न केले. आपला मुलगा मुलाला आमदार व्हावा यासाठी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात चाचपणी केली. कोणाला घरी घालवायचे हे लोकांना चांगलंच समजतंय. जर सत्ता आणि पैशाच्या जोरावर राजकारण होत असते तर मी आमदार झालो नसतो,” असा दावा देखील पडळकर यांनी केला आहे.
Gopichand Padalkar on Jayant Patil
दरम्यान, जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली असून याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू शकतात. याप्रकरणी जयंत पाटलांच्या प्रत्युत्तराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीही गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त टीका केल्याने अडचणीत आले होते. आताही त्यांच्या अडचणी वाढू शकतात, असे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :