जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट अन् सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना का काढलं?

लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा दावा करत जयंत पाटील आणि रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published On: 

Ladki Bahin Yojana Jayant Patil criticizing Maharashtra state government

पुणे – निवडणुकीच्या काळात दर महिन्याला १५०० रुपये खात्यात आल्याने खूश असलेल्या ‘लाडक्या बहिणींना’ आता खरोखरच मोठा धक्का बसणार आहे का? निवडणुका होताच राज्यातून चक्क ८० लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याच मुद्द्यावरून आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. येत्या वर्षभरात आणखी ५० ते ६० लाख महिलांना या योजनेतून बाहेर काढले जाईल, असा दावा त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Ladki Bahin Yojana Update 80 Lakh Women Disqualified

जयंत पाटील यांनी सरकारच्या या निर्णयावर सडकून टीका केली. निवडणुकीपूर्वी मते मिळवण्यासाठी सरकारने सरसकट सर्वांना पैसे वाटले. त्यावेळी हे सरकार जणू कर्णाचा दुसरा अवतार असल्यासारखे दान करत होते, मग आता अचानक या लाभार्थी महिला बोगस कशा झाल्या? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

जयंत पाटील यांनी ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत राज्याच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवरही बोट ठेवले आहे. राज्यावर मोठे आर्थिक संकट आले असून वाढत्या वित्तीय तुटीमुळेच ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशी सरकारची अवस्था झाल्याचा घणाघात पाटील यांनी केला. या लाडक्या बहिणींची फसवणूक झाली असून सरकारला आता केवळ बजेट कमी करायचे आहे, असा दावाही त्यांनी केला.

याच मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनीही आक्रमक भूमिका घेत सरकारला कडक इशारा दिला आहे. केवायसीच्या (KYC) नावाखाली केवळ बहाणा सुरू असून, टप्प्याटप्प्याने नावे उडवून ही योजनाच गुंडाळण्याचा सरकारचा खरा डाव असल्याचा आरोप रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये केला आहे. त्यामुळेच… जर या १५ हजार कोटींची वसुली करायचीच असेल तर ती मंत्र्यांकडून करा, पण महिलांना त्रास दिला तर याद राखा, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही