🕒 1 min read
महिलांचं लैंगिक शोषण करणारा आणि भोंदूगिरीच्या नावाखाली करोडोंचा गंडा घालणारा बाबा अशोक खरातच्या आयुष्यावर चक्क सिनेमा येतोय, ही बातमी ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना?
सध्या राज्याच्या राजकारणात याच भोंदू खरातच्या (Bhondoo Kharat Movie) कारनाम्यांची जोरदार चर्चा आहे. आता याच बहुचर्चित सिनेमाच्या निमित्ताने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यात जोरदार जुंपली असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Bhondoo Kharat Movie
माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर थेट हल्लाबोल केला. “मुलुंडचे एचडी व्हिडीओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांना अशोक खरातची भूमिका मिळते का? हे बघणं जरा औत्सुक्याचं ठरेल,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
खरातने भोंदूगिरीच्या माध्यमातून सामान्य लोकांपासून ते अगदी सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनाही कसं गंडवलं, हे संपूर्ण देशाने पाहिलं आहे. आता याच विषयावर येत असलेल्या सिनेमात दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार असल्याची सध्या चर्चा आहे.
यावर बोलताना अंधारे म्हणाल्या की, दीपाली सय्यद या मुळात एक कलाकार आहेत. त्यामुळे त्यांनी कुठे काम करावं याचं पूर्ण स्वातंत्र्य त्यांना असलं पाहिजे. पण केवळ सिनेमात काम करतात म्हणून त्यांना धमक्या देणं चुकीचं असून आपण त्याचा तीव्र निषेध करतो.
दुसरीकडे, अंधारेंच्या या बोचऱ्या टीकेनंतर दीपाली सय्यद यांनीही पलटवार करत थेट मोठा गौप्यस्फोट केला आहे. “सुषमा अंधारेंची मला कीव येते. एक महिला म्हणून त्यांनी असं बोलणं अजिबात शोभत नाही,” असा संताप सय्यद यांनी व्यक्त केला.
इतकंच नाही तर, खरात प्रकरणात कुठेतरी अंधारेंचाही संबंध असल्याने सिनेमात त्यांचीही भूमिका असणार आहे, असा धक्कादायक दावा दीपाली सय्यद यांनी केल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमात अशोक खरातच्या भूमिकेसाठी थेट बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीला विचारणा केली जाऊ शकते. हा सिनेमा येत्या ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याने आता पडद्यावर नेमकं काय पाहायला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शुबमन गिलने फायनलमधील पराभवानंतर मौन सोडलं, आरसीबीच्या विजयावर म्हणाला की…
- विराट कोहलीने अखेर उघड केलं आरसीबीच्या जेतेपदाचं गुपित, मुंबई इंडियन्सचा उल्लेख करत म्हणाला की…
- राज्यात पावसाची एन्ट्री अन् उकाड्यापासून सुटका; पण ‘या’ जिल्ह्यात उडाली दाणादाण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












