सुषमा अंधारेंना सुशांत शेलारांचा धोबीपछाड; ‘मान अशी-तशी केल्याने…’ म्हणत थेट डिवचलं!

सुशांत शेलार यांनी चित्रपट महामंडळ निवडणुकीवरून सुषमा अंधारेंवर बोचरी टीका केली आहे. तसेच विजय पाटकरांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला.

Published On: 

Sushant Shelar on Sushma Andhare: शेलारांचा अंधारेंवर हल्लाबोल!

राजकारणात कधी कुठे ठिणगी पडेल आणि कुणाचा कुणाशी सामना होईल सांगता येत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. सध्या राज्यात विधान परिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच, दुसरीकडे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतही (Chitrapat Mahamandal Election) राजकारण चांगलंच तापलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आणि मंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोप नुकताच झाला होता. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत कलाक्षेत्र बळकावत असल्याची टीका केली.

Sushant Shelar on Sushma Andhare

पण आता या वादात अभिनेता आणि शिवसेना नेते सुशांत शेलार यांनी उडी घेतली असून, थेट अंधारेंनाच डिवचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुषमा अंधारेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शेलार यांनी चांगलाच पलटवार केला. नीलम शिर्के या अभिनेत्री असल्याने त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच अंधारेंना लक्ष्य करत, “मग तुम्ही अभिनेत्री व्हा आणि तुम्हीसुद्धा उमेदवारी अर्ज भरा. केवळ मान अशी आणि तशी केल्यामुळे आपण स्वतःला अभिनेत्री समजता का?” असा बोचरा सवाल शेलार यांनी विचारला.

इतकंच नाही तर सुशांत शेलार यांनी विजय पाटकरांवरही भ्रष्टाचाराचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. न्यायालयाच्या आदेशानेच पाटकरांचे संचालकपद रद्द झाल्याचे सांगत, त्यांच्या कार्यकाळात ‘मानाचा मुजरा’ कार्यक्रमात आर्थिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप शेलारांनी केला.

“१५ ते १६ लाखांत होणारा कार्यक्रम तब्बल ५७ लाख रुपयांत करण्यात आला. तसेच ऑडिटमध्ये १० लाख ७८ हजार रुपयांचा मोठा फरक आढळला,” असा धक्कादायक दावा शेलार यांनी केला आहे.

पाटकरांचे आरोप खोटे असून त्यांनी असल्या अफवा पसरवू नयेत, असा थेट इशाराही सुशांत शेलार यांनी दिला आहे. यामुळे आता महामंडळाच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणखी झडण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही