सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे, पेट्रोल पंपांवर रांगा वाढल्यात आणि वाढत्या इंधनदरांनी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. अशातच आता या तापलेल्या वातावरणात एका सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने थेट अंबाबाईच्या दरबारात मोठी मागणी केली आहे.
सध्या देशात इंधनाच्या भडकलेल्या किमतींमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मे महिन्यातच पेट्रोलचे दर पुन्हा वाढले आहेत. याच ज्वलंत मुद्द्यावर आता प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी रोखठोक भाष्य केले आहे.
Pravin Tarde News
‘देऊळ बंद २’ चित्रपटाच्या टीमसोबत ते कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील वाढत्या Petrol Diesel Prices ला जागतिक पातळीवरील संकटाशी जोडले आहे.
इंधन दरवाढीबाबत बोलताना तरडे म्हणाले की सध्या जागतिक स्तरावर जे काही सुरू आहे त्याचाच हा थेट फटका सर्वसामान्यांना बसत आहे. “युद्ध थांबले की पेट्रोल आणि डिझेलचे आकडे नक्कीच खाली येतील अशी मी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केली आहे,” असा मोठा खुलासा त्यांनी माध्यमांसमोर केला.
यावेळी त्यांनी ‘देऊळ बंद २’ बनवण्यामागचा हेतूही स्पष्ट केला. राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबवाव्यात आणि बळीराजाला बळ मिळावे हाच या चित्रपटाचा मूळ गाभा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेक्षक या चित्रपटाला डोक्यावर घेत असून “शेतकऱ्याच्या मनात चुकूनही आत्महत्येचा वाईट विचार येऊ नये कारण शेतकरी हाच खरा परमेश्वर आहे,” अशी भावनिक साद तरडेंनी घातली.
भारतात ८८ ते ९० टक्के कच्चे तेल आयात केले जाते. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारताच्या आयात बिलावर प्रचंड दबाव आला आहे. त्यामुळे जोपर्यंत जागतिक परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत इंधन स्वस्त होण्याची चिन्हे कमीच दिसत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- सई ताम्हणकर भडकली! प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ कान्स लूकवर थेटच बोलली; म्हणाली ‘काय परिधान करावं आणि……..’
- “आईनेच लिव्ह-इनमध्ये राहायला सांगितलं…..”; तेजस्वीचा मोठा खुलासा, बॉयफ्रेंडसोबत थाटणार संसार?
- “लग्नानंतर कोणीच मिस्टर परफेक्ट नसतो…”, राकेश बापटच्या पूर्व पत्नीचं लग्नावर मोठं वक्तव्य
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









