“आईनेच लिव्ह-इनमध्ये राहायला सांगितलं…..”; तेजस्वीचा मोठा खुलासा, बॉयफ्रेंडसोबत थाटणार संसार?

करण कुंद्रासोबत लग्नाआधी तेजस्वी प्रकाशच्या आईनेच त्यांना लिव्ह-इनमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. आईच्या या खळबळजनक वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

Published On: 

Tejasswi Karan Kundrra: तेजस्वीच्या आईचा मोठा गौप्यस्फोट!

मनोरंजन विश्वात कधी कोणाची लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचेल आणि कोणाच्या नात्यात काय ट्विस्ट येईल, हे सांगता येत नाही. याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय. निमित्त ठरलंय ते टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडीपैकी एक असलेल्या तेजस्वी (Tejasswi Prakash) आणि करणच्या नात्यातील एक मोठा गौप्यस्फोट!

‘बिग बॉस १५’ मधून सुरू झालेली Tejasswi Prakash Karan Kundrra यांची लव्हस्टोरी आता एका नव्या वळणावर आली आहे. बिग बॉसच्या घरात जुळलेली ही जोडी बाहेर आल्यावरही चाहत्यांची फेव्हरेट ठरली.

Tejasswi Prakash Karan Kundrra

नुकतंच ‘देसी ब्लिंग’ या शोमध्ये करणने तेजस्वीला हिऱ्याची अंगठी घालत सर्वांसमोर प्रपोज केलं. चाहते आता त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, याच दरम्यान लग्नाआधीच्या एका निर्णयावरून मोठी खळबळ उडाली आहे.

नुकतेच हे कपल नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. तिथे बोलताना करण कुंद्राने एक धक्कादायक खुलासा केला. लग्नाआधीच लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय त्यांचा नसून, चक्क तेजस्वीच्या आईचा होता!

“तेजस्वीचा स्वभाव समजून घेणं सोपं नाही, तिला सांभाळणं कठीण आहे, त्यामुळे आधी नीट विचार कर,” अशी थेट वॉर्निंगच तिच्या आईने करणला दिली होती. या मुलाखतीत करणने सांगितलं की, तेजस्वीच्या आईचा स्वतःच्या मुलीवरच विश्वास नव्हता. तिने करणला स्पष्ट सांगितलं होतं की, माझी मुलगी ‘नॉर्मल’ नाही, त्यामुळे लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी तिला सांभाळता येतंय का, हे एकत्र राहून तपासून पाहा.

साधारणपणे अनेक पालक लिव्ह-इन रिलेशनशिपच्या विरोधात असतात, पण इथे मात्र चक्क आईनेच हा सल्ला दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे आईला मुलीच्या स्वभावाची एवढी काळजी होती, तर दुसरीकडे तेजस्वीच्या वडिलांनी मात्र या नात्याला पहिल्या दिवसापासून पूर्ण पाठिंबा दिला आहे.

आता दोघांनी लिव्ह-इनची परीक्षा पास करत एंगेजमेंटही केलीये, त्यामुळे हे जोडपं प्रत्यक्षात बोहल्यावर कधी चढतंय, याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही