Share

उर्फी जावेदने खरोखर धर्म बदलून ‘रिता भारद्वाज’ नाव ठेवलंय? स्क्रीनशॉट्स शेअर करत स्वतःच केला मोठा खुलासा

उर्फी जावेदने धर्म बदलल्याचा दावा एका महिला क्रिएटरने केला होता. यावर संतापलेल्या उर्फीने चॅटचे स्क्रीनशॉट्स शेअर करत खोट्या बातम्या न पसरवण्याचा थेट इशारा दिला आहे.

Published On: 

Urfi Javed Religion - Urfi Javed shares screenshots hitting back at fake conversion claims

🕒 1 min read

नेहमीच आपल्या अतरंगी कपड्यांमुळे आणि बेधडक विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकणारी उर्फी जावेद आता चक्क धर्म बदलल्याच्या चर्चेमुळे हेडलाईन्समध्ये आली आहे. सोशल मीडियावर सध्या उर्फीने (Urfi Javed) धर्म बदलून तिचं नाव ‘रिता भारद्वाज’ ठेवल्याचा मोठा दावा केला जात आहे, पण यात तथ्य किती?

एका महिला डिजिटल क्रिएटरने व्हिडीओ शेअर करत उर्फीवर धर्मांतराचा आणि तिच्या कपड्यांवरून जोरदार टीका केली होती. स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या या महिलेच्या दाव्यामुळे इंटरनेटवर एकच खळबळ उडाली. मात्र, आता स्वतः उर्फीने यावर मौन सोडलं असून त्या इन्फ्लुएंसरची चांगलीच कानउघडणी केली आहे.

Urfi Javed Religion

उर्फीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून या महिलेसोबत झालेल्या संभाषणाचे थेट स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या या महिलेला सडेतोड उत्तर देत उर्फी म्हणाली, “कसे कसे लोक स्वतःला पत्रकार म्हणवतात. आंटी, तुम्ही प्लीज थोडा अभ्यास करा. मी कधीच माझा धर्म बदललेला नाही.”

पुढे ती म्हणाली, “मी कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. मी केवळ कपड्यांनीच नाही, तर माझ्या शब्दांनीही नग्न आहे. आज माझा मूड नाहीये. तुम्हाला माझ्यावर टीका करायची असेल तर बिनधास्त करा, पण अशा चुकीच्या गोष्टी आणि खोट्या बातम्या पसरवू नका.”

एवढंच नाही तर, या इन्फ्लुएंसरच्या मेकअपवरही उर्फीने बोचरी टीका केली. “तुमचा घाणेरडा मेकअप पाहून मला लाज वाटते. कुणालाही तुमची पर्वा नाही,” अशा जळजळीत शब्दांत उर्फीने आपला संताप व्यक्त केला आहे. उर्फीच्या या थेट स्पष्टीकरणामुळे आता धर्मांतराच्या या खोट्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही