Share

उर्फी जावेदचा रवी किशनच्या मुलीवर थेट हल्ला; ‘मागच्या जन्मी साप होतीस का?’, नेमकं कारण काय?

बहीण डॉली जावेद रिॲलिटी शोमधून बाहेर पडल्यानंतर उर्फी जावेद भडकली असून, तिने अभिनेते रवी किशनची मुलगी रीवावर दुटप्पीपणाचा गंभीर आरोप केला आहे.

Published On: 

Urfi Javed angry on Ravi Kishan daughter Riva Kishan over Dolly Javed eviction

तोंडावर गोड बोलायचं आणि वेळेवर पाठीत खंजीर खुपसायचा, असं कुणी केलं की कोणाचाही संताप होणारच. टेलिव्हिजनवर सध्या सुरू असलेल्या एका रिॲलिटी शोमध्ये असाच काहीसा प्रकार घडला असून, एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

कुणाल खेमू होस्ट करत असलेल्या ‘अलायन्स’ (Alliance) या शोमधून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डॉली जावेद नुकतीच बाहेर पडली. मात्र, तिच्या एलिमिनेशनपेक्षा आता तिची बहीण उर्फी जावेदच्या (Urfi Javed) एका संतप्त पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Urfi Javed on Riva Kishan

डॉली शोमधून बाहेर पडल्यानंतर उर्फीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी तिच्या रडारवर आहे ती प्रसिद्ध अभिनेते रवी किशन यांची मुलगी रीवा किशन (Riva Kishan).

उर्फीने शेअर केलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये रीवा अत्यंत गोड शब्दांत डॉलीच्या मैत्रीचं कौतुक करताना दिसतेय. डॉलीला गेममध्ये आणखी पुढे जाण्याची संधी मिळायला हवी होती, असंही ती या क्लिपमध्ये म्हणत आहे.

पण इथेच मोठा गौप्यस्फोट झाला. डॉलीला शोमधून बाहेर काढण्यासाठी ज्या स्पर्धकांनी मतदान केलं, त्यात रीवा स्वतः आघाडीवर होती. हा दुटप्पीपणा आणि कृतीतला विरोधाभास पाहून उर्फी चांगलीच भडकली.

तिने थेट इन्स्टाग्राम स्टोरीवर रीवाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि “तू मागच्या जन्मी साप होतीस का?” असा खोचक सवाल विचारला. स्वतः डॉलीनेही यावर प्रतिक्रिया देताना, “मला इथे एक साप दिसतोय,” असं लिहित सापाचे इमोजी पोस्ट केले आहेत.

या शोमध्ये डॉलीचा प्रवास अत्यंत स्पष्टवक्तेपणाचा राहिला होता. विशेषतः अभिनेता कुशल टंडनसोबतचे तिचे वाद चांगलेच चर्चेत राहिले. महिलांवर वर्चस्व गाजवण्याच्या कुशलच्या वृत्तीला तिने ठामपणे विरोध केला होता. आता ती शोमधून बाहेर पडली असली तरी, उर्फीच्या या प्रहारामुळे ‘अलायन्स’ शोची बाहेरही मोठी खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही