Share

प्राजक्ता माळीची ‘देवखेळ’ सीरिज ओटीटीवरून हटवणार? विधानसभेत शेलारांचे मोठे आदेश

शंकासूर प्रथेचा अपमान केल्याच्या आरोपावरून प्राजक्ता माळीच्या ‘देवखेळ’ सीरिजवर विधानसभेत कारवाईचे आदेश. सीरिज ओटीटीवरून हटवण्याची शक्यता.

Published On: 

Devkhel Web Series Controversy Prajakta Mali Ankush Chaudhari

मनोरंजनाच्या नावाखाली एखाद्या जुन्या, पवित्र परंपरेला धक्का लावला तर काय होऊ शकतं? प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि अंकुश चौधरी यांच्या ‘देवखेळ’ (Devkhel Web Series) या बहुचर्चित वेब सीरिजच्या बाबतीत नेमकं हेच घडलं आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजवरून कोकणात सध्या चांगलाच संताप पाहायला मिळत आहे. आता हा वाद थेट विधानसभेत पोहोचला असून, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी याप्रकरणी कारवाईचे कडक निर्देश दिले आहेत.

Devkhel Web Series Controversy

त्यामुळे ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवरून कायमची हटवली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन-खेळे ही अत्यंत जुनी आणि ग्रामदैवतांशी जोडलेली लोककला आहे. या परंपरेला कोकणात मोठं धार्मिक पावित्र्य आहे.

मात्र, ‘देवखेळ’ सीरिजमध्ये या लोककलेतील ‘शंकासूर’ या दैवताचं अत्यंत विपरित आणि अपमानकारक चित्रण करण्यात आल्याचा आरोप होत आहे. थरार निर्माण करण्याच्या नादात निर्मात्यांनी लोककलेचा विपर्यास केल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. यामुळेच कोकणातून या सीरिजला कडाडून विरोध होत आहे.

या सीरिजची कथा गुहागरमधील ‘देवतळी’ या काल्पनिक गावावर आधारित आहे. दरवर्षी शिमग्याला गावात एक खून होतो आणि शंकासूर पापी माणसाला शिक्षा देतो, अशी अंधश्रद्धा गावात असते. या खुनांच्या मालिकेचा तपास पोलीस अधिकारी विश्वास सरंजामे (अंकुश चौधरी) कसा करतो, हे यात दाखवण्यात आलं आहे.

पण कथेच्या मांडणीवरून सुरू झालेला हा वाद आता चांगलाच चिघळला आहे. विधानसभेत कारवाईचे निर्देश मिळाल्यामुळे आता निर्माते काय भूमिका घेतात आणि ओटीटीवरून ही सीरिज खरंच गायब होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही