Share

पाकिस्तानचे दोन तुकडे होणार? 15 जुलैला पाकच्या संसदभवनातून होणार सर्वात मोठी घोषणा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागले असून १५ जुलैला संसद भवनातून स्वातंत्र्याची घोषणा करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Published On: 

PoK Protest: Protesters in PoK demonstrating against the Pakistan government and army.

🕒 1 min read

पुणे – पाकिस्तानच्या सीमेत असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) सध्या जे काही घडतंय, त्याने अख्ख्या जगाचं लक्ष वेधलं आहे. जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी अ‍ॅक्शन कमिटीने (JAAC) थेट १५ जुलै रोजी पाकिस्तानच्या संसद भवनातून स्वातंत्र्याची घोषणा करण्याचा इशारा दिलाय. आता हे धाडस म्हणजे केवळ एक इशारा आहे की पाकिस्तानच्या भविष्यातील मोठ्या अस्थिरतेची नांदी, हा प्रश्न आता अनेकांना सतावू लागलाय.

स्थानिक नागरिक आणि नेत्यांनी थेट पाकिस्तानी सैन्याला ताबडतोब पीओके सोडण्याचे आदेश दिले आहेत. सैन्याने काही भागांना दहशतवादी क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे इथल्या लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. दुसरीकडे, आंदोलकांना चिरडण्यासाठी असीम मुनीर यांच्या आदेशाने केलेल्या गोळीबारात ३० नागरिकांचा बळी गेल्याने परिस्थिती चिघळली आहे. या हत्याकांडाची तुलना आता जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली जात असून, आंदोलनाला आता अधिक हिंसक वळण लागलं आहे.

PoK Protest: स्वातंत्र्याचा एल्गार आणि सैन्याचा वेढा

परिस्थिती किती हाताबाहेर गेली आहे, याचा अंदाज यावरून येतो की, सध्या पीओकेला लष्करी छावणीचं स्वरूप आलं आहे. तब्बल १७ हजार सैनिकांना तिथे तैनात करण्यात आलं असूनही नागरिक माघार घ्यायला तयार नाहीत. २७ जुलैला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच आपल्या ३८-सूत्रीय मागण्या पूर्ण व्हाव्यात, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

केवळ स्थानिक मीडियाच नाही, तर आता आंतरराष्ट्रीय मीडियालाही बोलावून पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका बाजूला निवडणुकीचा दबाव आणि दुसरीकडे जनतेचा वाढता रोष, यामुळे पाकिस्तान सरकार समोर मोठं आव्हान उभं राहिलंय. १५ जुलैला नक्की काय घडतं, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही